खारघरमध्ये मतदारयाद्यांत घोळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 12:37 AM2019-04-24T00:37:37+5:302019-04-24T00:38:49+5:30

नगरसेविकेचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन

Kharghar voters voting! | खारघरमध्ये मतदारयाद्यांत घोळ!

खारघरमध्ये मतदारयाद्यांत घोळ!

Next

पनवेल : लोकसभेच्या निवडणुका सर्वत्र सुरू आहेत. विविध टप्प्यात देशभरात या निवडणुका होत आहेत. मात्र, मतदारयादींतील घोळामुळे नावे शोधताना नागरिकांची दमछाक होताना अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

खारघर शहरातील मतदारयादींमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहे, त्यामुळे निवडणुकीच्या टक्केवारीवर परिणाम होऊ शकतो. या संदर्भात स्थानिक नगरसेविका व महिला बाल कल्याण सभापती लीना गरड यांनी साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रेय नवले यांना निवेदन सादर करून मतदारयादींमधील निर्माण झालेला गोंधळ लवकरात लवकर दूर करण्याची मागणी केली आहे.

खारघर नोडमध्ये एकूण एक लाख ३० हजारांच्या आसपास मतदार आहेत. शहरात एकूण आठ मतदार केंद्र आहेत, तसेच ८६ बूथचा समावेश आहे. यापूर्वीची मतदार केंद्रे रद्द झाल्याने शहरातील मतदारयादींमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याचे दिसून येत आहे. एका कुटुंबातील चार मतदारांची नावे वेगवेगळ मतदार केंद्रावर येत असून, त्यामुळे मतदानाचा टक्का कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या गोंधळामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात. खारघर शहरात ही समस्या मोठ्या प्रमाणात असल्याने गरड यांनी या संदर्भात शहरात मतदारांना मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी १०० मदत केंद्र उभारण्याची मागणी साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दातात्रेय नवले यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे. विशेष म्हणजे, निवडणूक आयोगामार्फत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्र म, उपाययोजना राबविल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात मतदारयादींचे घोळ अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे, अशा परिस्थितीत घराजवळ असलेल्या मतदार केंद्रामध्ये आपले नाव न येता शहराच्या दुसºया टोकाच्या केंद्रात नाव येत असल्याने मतदारांची गैरसोय होत असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या संदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन या वेळी गरड यांना दिले आहे.

Web Title: Kharghar voters voting!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.