‘रन फॉर कॅशलेस’साठी धावले खारघरवासी
By admin | Published: January 23, 2017 05:54 AM2017-01-23T05:54:41+5:302017-01-23T05:54:41+5:30
खारघर मॅरेथॉन कमिटी आणि रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झॅक्शन’
पनवेल : खारघर मॅरेथॉन कमिटी आणि रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘रन टू प्रमोट कॅशलेस ट्रान्झॅक्शन’ हे घोषवाक्य घेऊन रविवारी खारघर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या राज्यस्तरीय स्पर्धेत हजारोंच्या संख्येत महाराष्ट्रातील खेळाडूंनी उपस्थिती लावली. स्पर्धेत पुरुषांच्या खुल्या गटात बीडच्या अविनाश साळवे तर महिलांच्या गटात वेस्टर्न रेल्वेच्या किरण सरेदार यांनी बाजी मारत अव्वल क्रमांक पटकावला.
रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मॅरेथॉनला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध नर्तिका सिनेअभिनेत्री सुधा चंद्रन उपस्थित होत्या. आर जे अर्चना आणि सलील यांनी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरु वात केली. स्पर्धेत जिल्हास्तरीय पुरुष गटात सुजित गमर याने तर महिला गटात सोनिया मोकल हिने प्रथम क्र मांक पटकावला. खारघर सेक्टर १९ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथून सकाळी ७ वाजता स्पर्धा सुरु झाली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, मॅरेथॉन कमिटीचे प्रमुख संयोजक परेश ठाकूर यांच्या नियोजनामुळे स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छेडलेल्या रोकडरहित व्यवहाराला चालना देण्यासाठी रन फॉर कॅशलेस हे मॅरेथॉनचे ब्रीदवाक्य होते.
बक्षीस वितरण समारंभाला उपस्थितीमध्ये सिनेकलाकार सिकंदर खान, आर्यन वैद्य, हिरानंदनीचे सीईओ निकेश शेट्टी, रोमल शर्मा, वाय. टी. देशमुख, अरु ण भगत, ज्ञानेश्वर तिडके, सिडकोचे खारघर प्रशासक सीताराम रोकडे, जयंत पगडे, रत्नप्रभा घरत, संजय पाटील, चारु शीला घरत, भाजप खारघर शहर प्रमुख ब्रिजेश पटेल, अनंता तोडेकर, अभिमन्यू पाटील, लीना गरड, प्रभाकर जोशी, किरण पाटील, दीपक शिंदे, बिना गोगरी आदींसह मोठ्या संख्येने स्पर्धक, खारघरमधील रिहवासी व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)