शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

खारघर कार्पोरेट पार्कच्या निविदा लवकरच; सिडकोने कसली कंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 11:28 PM

मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर १२० हेक्टर जागेवर उभारणार प्रकल्प

- कमलाकर कांबळे नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून मुंबईतील बीकेसीच्या धर्तीवर खारघर येथे अत्याधुनिक दर्जाचे कार्पोरेट पार्क (केसीपी) प्रस्तावित करण्यात आले आहे. विविध कारणांमुळे मागील दोन वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाला नवीन वर्षात गती देण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यानुसार पुढील दोन-तीन महिन्यांत खारघर कार्पोरेट पार्कसाठी निविदा काढल्या जाणार आहेत, अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ‘लोकमत’ला दिली.सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई परिसरात मोठमोठे अंतरराष्ट्रीय प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नैना प्रकल्प, जेएनपीटी, प्रस्तावित शिवडी सी लिंक, मेट्रो या प्रकल्पांचा समावेश आहे. तसेच खारघर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे गोल्फ कोर्स उभारण्यात आले आहेत. या सर्व प्रकल्पांमुळे नवी मुंबईकडे एक नवे आर्थिक केंद्र म्हणून पाहिले जात आहे. या पार्श्वभूमीवर बीकेसीच्या धर्तीवर नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय वाणिज्य संकुल उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुसार खारघर येथील सेंट्रल पार्कच्या बाजूला १२० हेक्टर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे कार्पोरेट पार्क उभारण्याचा निर्णय जानेवारी २०१६ मध्ये घेण्यात आला होता. जानेवारी २०१७ मध्ये या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धात्मक प्रक्रियेतून प्राप्त झालेल्या सात कंपन्यांच्या विकास आराखड्यांची सिडकोने निवड केली होती. निवड करण्यात आलेल्या या सात वास्तुविशारदांना आपले अंतिम आरखडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्राप्त झालेल्या सातपैकी एका उत्कृष्ट वास्तुविशारद व सल्लागार कंपनीची निवड करण्यासाठी सिडकोने पाच तज्ज्ञांची एक समिती गठीत केली होती.या समितीने सिंगापूरच्या ईडीबी डिझायनर या कंपनीच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे. त्यानुसार प्रस्तावित कार्पोरेट पार्कचा आराखडा तयार करण्यासाठी ईडीबी डिझायनर या कंपनीची गेल्या वर्षी नियुक्ती करण्यात आली होती. या कंपनीने कार्पोरेट पार्कचा अत्याधुनिक स्वरूपाचा आराखडा तयार करून अलीकडेच सिडकोला सादर केला आहे. त्यानुसार कार्पोरेट पार्कमध्ये आपले कार्यालय सुरू करू इच्छिणाऱ्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्पोरेट उद्योजकांना पाचारण केले जाणार आहे. त्यासाठी पुढील दोन-तीन महिन्यांत निविदा काढल्या जाणार असल्याचे लोकेश चंद्र यांनी स्पष्ट केले आहे.केसीपीची वैशिष्ट्येपाच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे सिडकोचे उद्दिष्टबहुतांशी इमारती पिरॅमिडच्या आकारात बांधण्याची संकल्पनापरदेशातील नाइटलाइफ धर्तीवर दुकाने व व्यावसायिक गाळ्यांची रचनानवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापासून १२.५ किलोमीटरचे अंतरखारघर रेल्वे स्थानकापासून केवळ ५ कि.मी.चे अंतरमेट्रो स्थानकापासून हाकेच्या अंतरावरसायन-पनवेल महामार्गापासून १.५ कि.मी. अंतर

टॅग्स :cidcoसिडको