अपहरण करून महिलेची हत्या करणाऱ्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2020 05:22 AM2020-03-06T05:22:49+5:302020-03-06T05:22:56+5:30

तो सराईत गुन्हेगार असून, त्याने लुटीच्या उद्देशानेच महिलेचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली दिली आहे.

Kidnapper arrested for abducting woman | अपहरण करून महिलेची हत्या करणाऱ्याला अटक

अपहरण करून महिलेची हत्या करणाऱ्याला अटक

Next

नवी मुंबई : कारमध्ये बसलेल्या महिलेचे कारसह अपहरण करून तिची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला बुधवारी रात्री अटक केली. तो सराईत गुन्हेगार असून, त्याने लुटीच्या उद्देशानेच महिलेचे अपहरण करून हत्या केल्याची कबुली दिली आहे. उलवे सेक्टर १९ येथे सोमवारी बाळकृष्ण भगत पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांच्या पत्नी प्रभावती (५६) ह्या कारमध्ये बसल्या होत्या. त्या एकट्याच बसल्याची संधी साधून एक जण कारमध्ये घुसला. त्याने कारसह प्रभावती यांचे अपहरण करून त्यांना सेक्टर २३ परिसरात नेले. तेथे त्यांच्यावर गोळी झाडून त्याने पळ काढला होता. प्रभावती यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले असता त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी कसून तपास सुरू केला. या गुन्ह्याची उकल करण्यासाठी परिमंडळ एक, परिमंडळ दोन तसेच गुन्हे शाखेची विविध पथके तयार केली होती. त्यांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्हीचे चित्रीकरण मिळवले होते. त्याद्वारे संशयित आरोपीची माहिती मिळाली होती.
बुधवारी संध्याकाळी खारघर परिसरात सापळा रचून एकाला ताब्यात घेण्यात आले. झडती वेळी त्याच्याकडे एक पिस्तूल, दोन मॅगझिन व नऊ काडतुसे आढळली. चौकशीत त्याचे नाव अशोककुमार कोनार (४२) असून तो उलवे सेक्टर ९ मध्ये राहणारा असल्याचे कळले. त्याने प्रभावती यांची हत्या केल्याचीही कबुली दिली. सखोल चौकशीअंती बुधवारी रात्री त्याला अटक केली. त्याने लुटीच्या उद्देशानेच प्रभावती यांचे अपहरण करून पळ काढल्याची कबुली दिल्याचे उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू असल्याचे ते म्हणाले.
>कारसह पकडले
गुन्ह्यानंतर तो ज्या कारने उलवे परिसरातून पळाला होता, त्याच कारसह तो खारघरमध्ये आढळून आला. ही कार त्याने वाशी परिसरातून चोरली होती. त्यानंतर कारची नंबरप्लेट बदलून तो अनेक दिवसांपासून वापरत होता.

Web Title: Kidnapper arrested for abducting woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.