कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांचा गुडघेदुखीचा त्रास वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 01:14 AM2020-12-15T01:14:41+5:302020-12-15T01:14:48+5:30

शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गुडघेदुखी सतावणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

Knee pain among senior citizens increased during the Corona period | कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांचा गुडघेदुखीचा त्रास वाढला

कोरोना काळात ज्येष्ठ नागरिकांचा गुडघेदुखीचा त्रास वाढला

Next

- अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : कोरोनाच्या लॉकडाऊन काळात घरीच स्वत:ला बंदिस्त करून घेतल्याने अनेक व्यक्तींचे वजन वाढले आहे. त्याचबरोबर, गुडघेदुखीचा 
त्रास सतावतो आहे. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गुडघेदुखी सतावणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पनवेल महापलिका क्षेत्रात मार्च महिन्यापासून लॉकडाऊन करण्यात आला होता. एप्रिल महिन्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यानुसार, पालिका क्षेत्रातील नागरिकांत प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले होते, तसेच बाजारपेठा, दळणवळण बंद असल्याने सर्वजन घरीच राहणे पसंत केले. तिन ते साडे तिन महिने लॉकडाऊन असल्याने घरात थांबणाऱ्या नागरिकांमध्ये वजनवाढीचे प्रमाण अधिक झाले. 

बाहेर पडावे, तर पोलिसांचा दंडुका पडत असल्याने घराबाहेर येणे नागरिकांनी टाळले. वजन वाढल्याने गुडघेदुखीच्या त्रासात भर पडली आहे. यात ज्येष्ठ नागरिकांना त्रास जास्त प्रमाणात आहे. 

वजन वाढल्याने त्रास वाढला
शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात गुडघेदुखीने त्रस्त असणाऱ्या रुग्णात वाढ झाली आहे. यात जास्त प्रमाणात वजन वाढल्याने होणारा त्रास तर थंडीमुळेही जुन्या गुढघेदुखीच्या त्रासात भर पडल्याच्या तक्रारी घेऊन दवाखाना गाठावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. लॉकडाऊन काळात घरी थांबल्याने तर व्यायामाचा अभावामुळेही या त्रासात भर पडली आहे. थंडीचे हुडहुडी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळेही जुने गुडघेदुखी असणारे रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी येत आहेत.

गुडघेदुखीत अशी घ्यावी काळजी
गुडघेदुखीचा त्रास कमी करण्यासाठी नागरिकांनी आपले वजन कमी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर, वजनात वाढ होऊ नये, याकरिता दैनंदिन व्यायाम, चालणे, जास्त वेळ मांडी घालून बसू नये, तसेच आहारात गोड, तूप, तेलकट पदार्थांचे सेवन करणे टाळावे. गुडघेदुखी कमी करण्यासाठी दैनंदिन व्यायाम करण्याचा सल्ला डॉक्टराकडून देण्यात येत आहे. कोरोनाबळी - टाळेबंदी उठल्यानंतर गुडघेदुखीपासून त्रस्त असणारे रुग्ण शासकीय, त्याचबरोबर खासगी रुग्णालयात तपासणीकरिता शंभरपेक्षा जास्त रुग्ण येत आहेत. 

रुग्णाचे वजन आणि कमी झालेली शारीरिक हलचाल, यामुळे ज्येष्ठ नागरिकांत गुडघेदुखीचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवतो. त्यामुळे योग्य वेळी उपचार घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे नियमित घेतल्यास गुडघेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत होते, तसेच दररोज व्यायाम, योगा करणे खूप गरजेचे आहे.
- बी. एस. लोहारे, अस्थिरोग तज्ज्ञ

Web Title: Knee pain among senior citizens increased during the Corona period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.