कोकण रेल्वेचा दोन दिवस पाच तासांचा मेगाब्लॉक; तीन गाड्यांच्या वेळापत्रकात अंशत: बदल
By कमलाकर कांबळे | Published: February 3, 2024 09:09 PM2024-02-03T21:09:38+5:302024-02-03T21:09:52+5:30
या मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.
नवी मुंबई : कोकण रेल्वेने आपल्या वेर्ना - माजोर्डा विभागातील वाहतूक आणि पॉवर ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी सोमवार आणि मंगळवार असे दोन दिवस पाच तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला असून, या मार्गावरून धावणाऱ्या काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.
वेर्णा - माजोर्डा विभागादरम्यान एफबीओ आणि पायऱ्या पाडण्यासाठी ५ फेब्रुवारी रोजी तीन तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्याचप्रमाणे दक्षिण पश्चिम रेल्वेच्या कॅन्सौलिम - माजोर्डा विभागादरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी ६ फेब्रुवारी रोजी दोन तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे ५ फेब्रुवारी रोजी सुटणारी मुंबई सीएसएमटी - मडगाव जंक्शन (२२२२९) ही वंदे भारत एक्स्प्रेस रत्नागिरी ते करमाळी विभागादरम्यान १ तासांसाठी रोखून धरली जाणार आहे. त्याचप्रमाणे ५ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा कुलेम - वास्को द गामा ( ०७३७९) डेमूचा प्रवास कुलेम - मडगाव विभागादरम्यान ५० मिनिटांसाठी स्थगीत केला जाणार आहे. तर ५ फेब्रुवारी रोजी सुरू होणारा वास्को दा गामा - कुलेम ( ०७३८०) डेमू प्रवास वास्को द गामा - संकवल विभागादरम्यान १ तासांसाठी थांबविला जाईल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे.