शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

कोकणवासीयांनो उद्योजक व्हा! दीपक केसरकर यांचा तरुणांना सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 5:38 AM

कोकणाला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, लवकरच सागरी मार्गाने कोकण जोडले जाणार आहे. त्यामुळे व्यवसायाचे अनेक पर्याय खुले होणार असल्याने कोकणवासीयांना उद्योजक होण्याचा सल्ला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला.

नवी मुंबई : कोकणाला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, लवकरच सागरी मार्गाने कोकण जोडले जाणार आहे. त्यामुळे व्यवसायाचे अनेक पर्याय खुले होणार असल्याने कोकणवासीयांना उद्योजक होण्याचा सल्ला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिला. ग्लोबल कोकण महोत्सवाच्या सांगता समारंभप्रसंगी ते वाशीत उपस्थित होते. तर येत्या काळात भातशेती लागवडीची जुनी पद्धत मोडीत काढून आरोग्याच्या दृष्टीने तंत्रज्ञानाचा वापर करण्याचाही सल्ला त्यांनी दिला.कोकण आणि केरळची जडणघडण समान आहे. त्यानुसार केरळप्रमाणचे कोकणला विकसित करण्याचा प्रयत्न येत्या काळात सरकार करणार असल्याचे केसरकर यांनी कार्यक्रमप्रसंगी सांगितले. या दरम्यान उच्चशिक्षित तरुणांसह अल्पशिक्षितांच्याही रोजगाराचा प्रश्न सोडवला जाणार असल्याचे ते म्हणाले. त्यामध्ये खादी ग्रामोद्योग, मँग्रोजमध्ये खेकडा पालन, नीरा उद्योगांसह इतर अनेक उद्योगांचा समावेश असेल. कोकणचा पर्यटन विकास केला जात असताना तिथे येणाºया पर्यटकांच्या सोईसाठी मोठ्या प्रमाणात निवासाची गरज निर्माण होऊ शकते. याकरिता पर्यटकांच्या पसंतीची सर्वच वैशिष्टे लक्षात घेऊन आवश्यक तिथे हॉटेल्स, रिसॉर्ट तयार केली जाणार आहेत. त्याशिवाय हॉप आॅन हॉप आॅफ या ए.सी. बोटी उपलब्ध करून त्याद्वारे खाडीकिनारची गावे पर्यटकांसाठी खुली केली जाणार असल्याचेही केसरकर यांनी सांगितले. तर पुढील सहा महिन्यांत कोकणमध्ये पंचतारांकित बोटीही उपलब्ध केल्या जाणार असल्याचेही ते म्हणाले; परंतु या सर्व सुविधा दिल्या जात असताना त्या चालवणार कोण? असा प्रश्न निर्माण होऊ नये, याकरिता कोकणातील तरुणांनी पुढाकार घेण्याचा सल्लाही त्यांनी दिला. भातशेतीसाठी चालत आलेल्या पद्धतीमुळे महिलांना पाठीचे आजार होत आहेत. हे टाळण्यासाठी तत्रज्ञानाचा वापर करण्याचेही त्यांनी सुचवले. अशा वेळी कोकणचे निसर्ग टिकून राहील व प्रदूषण होणार नाही, असे प्रकल्प कोकणात यावे, अशी सूचना त्यांनी केली.या वेळी माजी आमदार प्रमोद जठार यांनी कोकणातील प्रत्येक प्रकल्पाला राजकीय विरोध होत असल्याची खंत व्यक्त केली. तर ग्रिन रिफायनरी प्रकल्पाबाबत जनतेमध्ये गैरसमज निर्माण केला जात आहे. यामुळे कोकणची नकारात्मकता जगभर पसरत आहे. तर ज्यांनी प्रकल्प पाहिलाही नाही, त्यांच्याकडून राखरांगोळीच्या टीका होत असल्याचा अप्रत्यक्ष टोला जठार यांनी उद्धव ठाकरे यांना मारला. त्यामुळे त्रयस्थ संस्थेने कोकणवासीयांना चांगल्या-वाईट गोष्टी सांगण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. तसेच कोकणात आरोग्यसुविधा नसल्याने उपचारांसाठी गोवा अथवा मुंबईला जावे लागते. त्यामुळे शासनाने सुपरस्पेशलिटी रुग्णालय सुरू करून कोकणवासीयांना मोफत आरोग्यसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Navi Mumbaiनवी मुंबई