कोकणवासीयांच्या 'वाट'मारिला आरटीओचा लगाम, खासगी ट्रॅव्हल्ससाठी दर निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 06:58 PM2023-09-08T18:58:16+5:302023-09-08T18:58:27+5:30

ज्यादा शुल्क आकारल्यास कारवाई

Konkan RTO rate fixed for private travels | कोकणवासीयांच्या 'वाट'मारिला आरटीओचा लगाम, खासगी ट्रॅव्हल्ससाठी दर निश्चित

कोकणवासीयांच्या 'वाट'मारिला आरटीओचा लगाम, खासगी ट्रॅव्हल्ससाठी दर निश्चित

googlenewsNext

नवी मुंबई : गणेशोत्सव निमित्ताने गावाकडे धाव घेणाऱ्या कोकणवासियांची प्रवास भाड्यात लूट होऊ नये यासाठी नवी मुंबई आरटीओने दर पत्रक प्रसिद्ध केले आहे. खासगी ट्रॅव्हल्स चालकांना त्याप्रमाणे प्रवासभाडे आकारण्याचे सूचित करण्यात आले आहे. यानंतरही त्यापेक्षा अधिक भाडे आकारल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल असेही सूचित करण्यात आले आहे. 

गणेशोत्सव निमित्ताने कोकणवासीयांसाठी कोकणातील विविध मार्गांवर नवी मुंबईसह लगतच्या शहरातून प्रवासी वाहतूक करणारी वाहने धावत असतात. त्यात एसटीसह खासगी ट्रॅव्हल्सचा देखील मोठा समावेश आहे. बहुतेक कोकणवासी रेल्वेने गावाकडे धाव घेत असतात. परंतु रेल्वेचे तिकीट कन्फर्म न झाल्यास त्यांना खासगी बसचा पर्याय वापरावा लागत असतो. अशावेळी ट्रॅव्हल्स चालकांकडून वाढीव दर आकारून अडवणूक केली जात असते. यामुळे सर्वसामान्यांची होणारी लूट टाळण्यासाठी आरटीओकडे तक्रारी येत असतात. त्या अनुशंघाने कोकणातील विविध मार्गांवर निश्चित केलेल्या दराप्रमाणेच भाडे आकारण्याचा सूचना नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाने नवी मुंबईतून कोकणातील २१ मार्गावर धावणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपन्यांना केल्या आहेत. शिवाय बस थांब्यांवर दर पत्रके लावून त्याचे पालन करण्याचेही सूचित केले आहे. त्याचे पालन न केल्यास संबंधित ट्रॅव्हल्स कंपनीला कारवाईला सामोरे जावे लागू शकते असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी सांगितले. प्रवासभाडे निश्चित केलेल्या २१ मार्गांमध्ये महाड, खेड, चिपळूण यासह कणकवली, गणपतीपुळे आदींचा समावेश आहे. 

आरटीओने निश्चित केलेले दर व थांबे. 

वाशी ते महाड - ४२८

वाशी ते खेड - ५७८

वाशी ते चिपळूण - ६२३

वाशी ते दापोली - ५३३

वाशी ते श्रीवर्धन - ४२८

वाशी ते संगमेश्वर - ७२८

वाशी ते लांजा - ८९३

वाशी ते राजापूर - ९५३

वाशी ते रत्नागिरी - ८४८

वाशी ते देवगड - ११८५

वाशी ते गणपतीपुळे - ९७५

वाशी ते कणकवली - १११०

वाशी ते कुडाळ - ११८५

वाशी ते सावंतवाडी - १२६०

वाशी ते मालवण - १२१५

वाशी ते जयगड - ९५३

वाशी ते विजयदुर्ग - १२००

वाशी ते मलकापूर - ९०८

वाशी ते पाचल - ९९०

वाशी ते गगनबावडा - १११०

वाशी ते साखरपा - ८१८

Web Title: Konkan RTO rate fixed for private travels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.