कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 03:24 AM2018-04-14T03:24:18+5:302018-04-14T03:24:18+5:30

आॅपरेशन विभाग, एक्स-रे, सोनोग्राफी मशिन आदी अत्यावश्यक साधन-सुविधांची वानवा, तडे गेलेल्या भिंती, छताची पडझड, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रूमची दुरवस्था, पाण्याची टंचाई अशा अनेक समस्यांनी उरण-कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राला वेढले आहे.

Koproli Primary Health Center | कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरवस्था

googlenewsNext

- मधुकर ठाकूर 
उरण : आॅपरेशन विभाग, एक्स-रे, सोनोग्राफी मशिन आदी अत्यावश्यक साधन-सुविधांची वानवा, तडे गेलेल्या भिंती, छताची पडझड, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रूमची दुरवस्था, पाण्याची टंचाई अशा अनेक समस्यांनी उरण-कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राला वेढले आहे. रुग्णालयाच्या दुरवस्थेमुळे गरोदर मातांचे आणि इतर रुग्णांचे हाल होत असताना लोकप्रतिनिधी आणि रायगड जिल्हा परिषद याकडे डोळेझाक करत आहे.
उरण तालुक्यातील गोरगरीब लोकांना माफक दरात उपचार मिळावेत, यासाठी शासनाने कोप्रोली प्राथमिक आरोग्यकेंद्राची उभारणी उरण तालुक्यातील कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीत केली. हे रुग्णालय रायगड जिल्हा परिषदेच्या ताब्यात असून, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून त्याचा कारभार पाहिला जातो; परंतु या रुग्णालयात वारंवार डॉक्टरांची, परिचारिकेची पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत असलेल्या एका डॉक्टरांवर, कर्मचाºयांवर कामांचा अतिरिक्त ताण पडत आहे.
उरण तालुक्याचे औद्योगिकीकरण झपाट्याने वाढत असले, तरी येथील लोक हे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात, डोंगरकपारीत (आदिवासी बांधव) राहत आहेत. त्यामुळे वाढत्या अपघातातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी तसेच पावसाळ्यातील साथीजन्य आजारांवर, सर्पदंश, कुत्रा चावणे यावर उपचार करून घेण्यासाठी जाणाºया रु ग्णांना त्यांच्या नातेवाईकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यात गरोदर मातांसाठी असणारे आॅपरेशन थिएटर गेली अनेक महिने बंद असल्याने आॅपरेशनसाठी गरोदर मातांची (रुग्णांची ) वणवण सुरू आहे.
तरी उरण तालुक्यातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोप्रोली प्राथमिक आरोग्यकेंद्रातील अवकळा दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी, रायगड जिल्हा परिषद यांनी एक दिवशी पाहणीदौरा करून सदर रुग्णालयात सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी या परिसरातील नागरिक, आदिवासी बांधव करीत आहेत. यासंदर्भात उरण तालुका वैद्यकीय अधिकारी इटकरे यांना विचारणा केली असता, त्यांनी माहिती देताना सांगितले की हे रु ग्णालय अनेक समस्यांनी ग्रासले आहे. त्यासंदर्भात वरिष्ठांकडे रु ग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली आहे. तसेच पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. तरी सध्या रुग्णालयात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
रायगड जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी यांना विचारणा केली असता त्यांनी माहिती देताना सांगितले की, या परिसरात सर्पदंश, कुत्रा चावणे, इतर साथीजन्य आजार उद्भवणाºया रु ग्णांत वाढ होत आहे. त्यामुळे सदर रु ग्ण कोप्रोली प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी येत असतात; परंतु सुविधांअभावी रुग्णांना नाइलाजाने इतर ठिकाणी उपचारार्थ जावे लागते. या रुग्णालयात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, संबंधित विभाग यांच्याकडे मागणी केली आहे; परंतु या रु ग्णालयासाठी डॉक्टर इतर सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित प्रशासन चालढकलपणा करीत आहे.
>अपघातातील रुग्णांवर तसेच पावसाळ्यातील साथीजन्य आजारांवर, सर्पदंश, कुत्रा चावणे यावर उपचारासाठी जाणाºया रु ग्णांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Koproli Primary Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.