कंटेन्मेंट झोनमध्ये कोविड १९ आरोग्य तपासणी; दहा वैद्यकीय पथकांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2020 01:17 AM2020-05-27T01:17:25+5:302020-05-27T06:43:18+5:30
कोपरखैरणे, तुर्भे परिसरात नवी मुंबई महानगरपालिके चीविशेष मोहीम
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये सर्वाधिक रुग्ण कोपरखैरणे व तुर्भे परिसरात सापडले आहेत. या परिसरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने विशेष उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. दोन्ही ठिकाणच्या कंटेन्मेंट झोनमध्ये विशेष मास स्क्रीनिंग मोहीम सुरू केली असून त्यासाठी दहा वैद्यकीय पथके तयार केली आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डॉ. डी.वाय.पाटील रूग्णालय आणि तेरणा रूग्णालय यांच्या सहयोगाने हे विशेष कोविड १९ आरोग्य तपासणी शिबिर, कोपरखैरणे सेक्टर १५ व १६ येथे सुरू करण्यात आले आहे. याठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे काटेकोर पालन करीत प्रामुख्याने कन्टेनमेंट झोनमधील नागरिकांचे मास स्क्रिनींग के ली जात आहे.
तज्ञ डॉक्टरांची १० वैद्यकीय पथके तयार के ली असून त्यांच्यासोबत नवी मुंबई महानगरपालिकेचे स्वयंसेवक कार्यरत आहेत. या तपासणी अंतर्गत तेथील नागरिकांचे थर्मल स्क्रिनींग करण्यात येत असून त्यांच्याशी डॉक्टर संवाद साधून त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती जाणून घेत आहेत. एखाद्या व्यक्तीमध्ये तापाची लक्षणे आढळल्यास पल्स आॅक्सिमिटरने त्याच्या शरीराची आॅक्सिजन पातळी लगेच तपासली जात आहे. तसेच कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरीत स्वॅब टेस्टींगसाठी पाठविण्यात येत आहे.
विशेष वैद्यकीय तपासणी शिबिराचे वेळापत्रक
मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून कोपरखैरणे विभागातील सेक्टर १५, १६ मध्ये दुपारी २ पर्यंत कोविड १९ विशेष वैद्यकीय तपासणी शिबिराचा लाभ ४०० हून अधिक नागरिकांनी घेतला आहे. २७ व २८ मे या दोन दिवशीही याच विभागात स्त्री मुक्ती संघटनेच्या इमारतीतील तळमजल्यावरील जागेत नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे २९ व ३० मे रोजी कोपरखैरणे सेक्टर २३ तसेच १ व २ जून रोजी कोपरखैरणे सेक्टर १२ येथे हे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
तुर्भे ३ व ४ जून रोजी सेक्टर २१ व २२ मध्ये तसेच ५ व ६ जून तुर्भे स्टोअर, ८ व ९ जून तुर्भे नाका येथे कंटेन्मेंट झोनमध्ये तपासणी शिबिराच्या माध्यमातून मास स्क्रीनिंग केले जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिका कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करीत असून नागरिकांनीही कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घरातच थांबावे व सोशल डिस्टन्सिंग पाळावे आणि कोरोनाची साखळी खंडित करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी के ले.