शहरात आंतरक्रीडा संकुलाचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 12:51 AM2019-03-10T00:51:28+5:302019-03-10T00:51:43+5:30

महापालिकेची उदासीनता; खेळाडूंना सुविधांचा वानवा

Lack of the inter-city complex in the city | शहरात आंतरक्रीडा संकुलाचा अभाव

शहरात आंतरक्रीडा संकुलाचा अभाव

Next

- योगेश पिंगळे

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात वास्तव्य करणाऱ्या अनेक खेळाडूंनी विविध क्रीडा क्षेत्रात विभाग, राज्य तसेच राष्टीय पातळींवर चमकदार कामगिरी करत शहराचा नावलौकिक उंचावला आहे; परंतु या खेळाडूंना महापालिकेच्या माध्यमातून सरावासाठी सुविधा नसल्याने त्यांना इतर शहरात जावे लागत आहे. महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे सर्वसमावेशक सुविधा असलेले आंतरक्र ीडा संकुल बांधण्यात न आल्याने शहरात नवनवीन खेळाडू घडण्यासही अडचणी येत आहेत.

नवी मुंबई महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पालिकेच्या वतीने तायक्वांडो, कबड्डी, बुद्धिबळ अशा काही क्र ीडा प्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येते होते. या प्रशिक्षणाच्या जोरावर विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्रात अनेक पदक मिळवून दिली असून पालिका शाळांचादेखील नावलौकिक वाढलेला आहे; परंतु महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाºया सोई-सुविधांची कमतरता असल्याने शहरात खेळाडू घडविण्यासाठी करण्यात येणारे प्रयत्न अपुरे पडत आहेत. चार हजार कोटी रुपयांचे आर्थिक बजेट असलेल्या महापालिकेचे सीबीडी येथे एकमेव राजीव गांधी क्रीडा संकुल असून, नेरु ळ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान बनविण्यात आले आहे; परंतु शहरात सर्व सुविधांयुक्त पालिकेचे एकही आंतरक्र ीडा संकुल नाही. त्यामुळे बॅडमिंटन, टेबलटेनिस, कराटे, त्वायक्वांडो, जिमन्यास्टिक, बॉक्सिंग, योगा, कॅरम, बुद्धिबळ, शूटिंग रेंज यासारख्या खेळांपासून शहरातील खेळाडू, शालेय विद्यार्थी तसेच क्रीडाप्रेमींना वंचित राहावे लागत आहे. शहरातील प्रत्येक नोडमध्ये सर्व सुविधांयुक्त आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा वास्तू बनवून त्याचा शहरातील नागरिकांना लाभ मिळणे अपेक्षित होते; परंतु तसे न झाल्याने नवीन क्र ीडा खेळाडू घडण्यावर त्याचा परिणाम होत आहे. क्रीडाच्या विविध वास्तू बांधण्यासाठी महापालिकेकडे अनेक भूखंड हस्तांतरित झाले आहेत; परंतु या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास महापालिका प्रशासन उदासीन असल्याचा आरोप खेळाडू करत आहेत. नवी मुंबई शहरात आॅलिम्पिक पात्र असलेले आणि विविध खेळांमध्ये चमकदार कामगिरी करून. विभाग-राज्य तसेच राष्टीय पातळींवर चमकदार कामगिरी करून शहराचे नावलौकिक उंचावलेल्या खेळाडूंची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. या खेळाडूंना नियमित सरावासाठी शहरात महापालिकेच्या किंवा खासगी संस्थांच्या सुविधा नसल्याने या खेळाडूंना सरावासाठी भिवंडी, पुणे आदी भागात जावे लागत आहे.

जलतरण खेळाडू सरावासाठी शहराबाहेर
नवी मुंबई शहरात आॅलिम्पिक पात्र असणारे खेळाडू राहतात. शहरात महापालिकेचा किंवा खासगी संस्थेचा आॅलिम्पिक दर्जाचा ५० मीटरचा तरणतलाव नसल्याने, या खेळाडूंना शासनाच्या पुणे बालेवाडी येथील जलतरण तलाव असलेल्या ठिकाणी सरावासाठी जावे लागत आहे.

अ‍ॅथलेटिक सिंथेलिक ट्रॅकची कमतरता
मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरात महापालिकेने ४०० मीटरचा अ‍ॅथलेटिक सिंथेलिक ट्रॅक बनविले आहेत. नवी मुंबई शहरात आंतररष्ट्रीय स्तरावर पदक प्राप्त खेळाडू वास्तव्य करतात; परंतु नवी मुंबई शहरात सरावासाठी सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना इतर शहरांमध्ये जावे लागत आहे.

Web Title: Lack of the inter-city complex in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.