पालिकेच्या प्रसाधनगृहांची दुरवस्था; नेरुळमधील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:55 AM2019-06-08T00:55:23+5:302019-06-08T00:55:35+5:30
नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष
नवी मुंबई : नेरुळ येथील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअम येथे ऑक्टोबर २०१७ मध्ये ‘फिफा’ वर्ल्डकपचे सामने झाले होते, त्याच वेळी शहरात स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मोहिमेच्या अनुषंगाने नेरु ळ परिसरात महापालिकेच्या माध्यमातून प्रसाधनगृहे बांधण्यात आली होती; परंतु आता त्यांच्या स्वच्छतेकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, त्यामुळे प्रसाधनगृहांचा वापर करताना नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.
केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेमध्ये स्वच्छ शहर म्हणून नवी मुंबई महापालिकेने ठसा उमटविला आहे. सर्वेक्षण काळात महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता, सुशोभीकरण, रंगरंगोटी, सार्वजनिक शौचालये. ई-टॉयलेट, शी-टॉयलेट असे विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतात.
ऑक्टोबर २०१७ साली शहराला १७ वर्षांखालील ‘फिफा’ वर्ल्डकप सामन्यांमुळे यजमान शहर म्हणून मान मिळाला होता. या सामन्यांच्या निमित्ताने शहरात येणाऱ्या नागरिकांवर शहराची छाप पडावी तसेच शहराबद्दल आकर्षण निर्माण व्हावे, यासाठी महापालिकेच्या वतीने नेरु ळमधील डॉ. डी. वाय. पाटील स्टेडिअम परिसर, यशवंतराव चव्हाण क्र ीडांगण, सायन-पनवेल महामार्गालगत वाशी, सानपाडा, जुईनगर, नेरु ळ, उरण फाटा, पामबीच मार्ग, भागातील अंतर्गत रस्ते, चौक अशा सर्वच ठिकाणी स्वच्छता, सुशोभीकरण, रंगरंगोटी करण्यात आली होती. विविध भागात मोकळ्या असलेल्या जागेवर, दुभाजकांच्या मध्ये, सायन-पनवेल महामार्गावरील उरण फाटा, नेरु ळ एलपी, सानपाडा रेल्वेस्थानकाच्या बाहेर, वाशी गाव, वाशी शिवाजी चौक, तुर्भे अशा विविध ठिकाणी सपाटीकरण करून झाडे लावून लहान उद्याने निर्माण करण्यात आली होती. या वेळीही नेरु ळमधील विविध भागात प्रसाधनगृहे बनविण्यात आली होती. स्पर्धा संपल्यावर लाखो रु पये खर्च करून शहरात राबविलेल्या उपक्र मांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नेरुळ परिसरात बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे या प्रसाधनगृहांचा नागरिकांना वापर करता येत नाही. या सर्व स्वच्छतागृहांची स्वच्छता करून नागरिकांना वापरासाठी खुली करण्याची मागणी नवी मुंबई काँग्रेसचे सचिव वीरेंद्र म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.