रानसई आदिवासीवाडीमध्ये भूस्खलन; रोड वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 01:04 AM2019-08-08T01:04:40+5:302019-08-08T01:04:48+5:30

विजेचे पोल पडल्यामुळे सहा पाडे अंधारात

Landslide in Ransai tribal area; Closed for road traffic | रानसई आदिवासीवाडीमध्ये भूस्खलन; रोड वाहतुकीसाठी बंद

रानसई आदिवासीवाडीमध्ये भूस्खलन; रोड वाहतुकीसाठी बंद

googlenewsNext

पनवेल : रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे कर्नाळा अभयारण्यातील रानसाई आदिवासीवाडीत भूस्खलन झाल्याने सहा पाड्यांचा संपर्क तुटला आहे. या भूस्खलनामुळे विजेचे खांबही कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

उरण परिसराला पाणीपुरवठा करण्यासाठी एमआयडीसीने रानसई धरण बांधले आहे, यामुळे उरणकरांना पाणी उपलब्ध झाले; पण धरणाच्या बाजूला असलेले आदिवासी पाडे अद्याप सुविधांपासून वंचित आहेत. धरणाच्या परिसरात कोंड्याची वाडी, बंगल्याची वाडी, सागाची वाडी, खैरकाठी, भुऱ्याची वाडी, मार्गाची वाडी या आदिवासी वसाहती आहेत. अनेक गैरसोयींना सामोरे जात येथील नागरिक जीवन जगत आहेत. मुसळधार पावसामुळे पाड्यांकडे जाणाºया रोडवर भूस्खलन झाले आहे, यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. विजेचे खांब कोसळल्यामुळे वीजपुरवठा बंद आहे. चार दिवसांपासून सर्व आदिवासी पाडे अंधारात असल्याची माहिती गोरक्षक पारधी यांनी दिली. प्रशासनाचे आदिवासींचे वास्तव्य असलेल्या रानसई परिसराकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. कर्नाळा अभयारण्य परिसरात रानसई जंगलात हे आदिवासी पाडे आहेत. वीजपुरवठा खंडित होऊनही महावितरणचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले नाहीत. प्रशासनाने या ठिकाणी लक्ष देण्याची व सुविधा देण्याची मागणी येथील रहिवासी गोरक्षक पारधी यांनी केली आहे.

Web Title: Landslide in Ransai tribal area; Closed for road traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.