एमआयडीसीत गांजाचा सर्वात मोठा अड्डा, तुर्भे नाक्यासह इंदिरानगरमध्ये अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 07:00 AM2018-04-03T07:00:26+5:302018-04-03T07:00:26+5:30

एमआयडीसीतील इंदिरानगरमधील हिरादेवी मंदिर परिसर गांजा सेवन करणाऱ्यांचा सर्वात मोठा अड्डा बनला आहे. दिवसभर ४० ते ५० जण गांजा सेवनासाठी येथे एकत्र येत आहेत. मंदिर परिसरामध्ये गांजाची लागवड केली आहे. या परिसरामध्ये अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असून स्थानिक पोलीस स्टेशनही याकडे दुर्लक्ष करत आहे.

 Large number of ammunition sold in Indiranagar along with Turbhe Naka, the biggest hawk in MIDC MIDC | एमआयडीसीत गांजाचा सर्वात मोठा अड्डा, तुर्भे नाक्यासह इंदिरानगरमध्ये अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री

एमआयडीसीत गांजाचा सर्वात मोठा अड्डा, तुर्भे नाक्यासह इंदिरानगरमध्ये अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री

Next

- नामदेव मोरे
नवी मुंबई  - एमआयडीसीतील इंदिरानगरमधील हिरादेवी मंदिर परिसर गांजा सेवन करणाऱ्यांचा सर्वात मोठा अड्डा बनला आहे. दिवसभर ४० ते ५० जण गांजा सेवनासाठी येथे एकत्र येत आहेत. मंदिर परिसरामध्ये गांजाची लागवड केली आहे. या परिसरामध्ये अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू असून स्थानिक पोलीस स्टेशनही याकडे दुर्लक्ष करत आहे.
अमली पदार्थमुक्त नवी मुंबई मोहिमेला शहरामध्ये खीळ बसू लागली आहे. अमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हे शाखेने मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे. परंतु स्थानिक पोलीस स्टेशनकडून कारवाईकडे दुर्लक्ष केले जात आहे. तुर्भे नाका, इंदिरानगर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची तक्रार या परिसरातील नागरिक व लोकप्रतिनिधींनी केली आहे. परंतु पोलिसांकडून ठोस कारवाई होत नाही. त्रस्त नागरिकांनी अमली पदार्थांच्या समस्या ‘लोकमत’च्या निदर्शनास आणून दिली. इंदिरा नगरमधील शांताबाई जोमा सुतार उद्यानाच्या बाजूला जंगलामध्ये हिरादेवी मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला पुजाºयासाठी झोपडी उभारण्यात आली आहे. या झोपडीमध्ये व मंदिराच्या मागील बाजूला असलेल्या विहिरीजवळ पहाटेपासून रात्रीपर्यंत अमली पदार्थांचे विशेषत: गांजाचे सेवन सुरू असल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. ‘लोकमत’ने रविवार व सोमवार दोन दिवस या परिसरामध्ये केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. या ठिकाणी गांजा सेवन करणाºयांचा सर्वात मोठा अड्डा तयार झाला आहे. ४० ते ५० जण येथे गांजा ओढण्यासाठी येत आहेत. यामध्ये तरुणांचे प्रमाणही जास्त आहे. बम बम भोलेचा गजर करत गांजा सेवन सुरू असते. गांजा ओढणाºयांविषयी नागरिकांनी पोलिसांकडेही तक्रार केली आहे, पण गांजा ओढणाºयांवर व गांजा पुरविणाºयांवर कारवाई केली जात नाही.
मंदिराच्या परिसरामध्ये पुजाºयाने गांजाची लागवड केली आहे. ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये दोन ठिकाणी गांजाची रोपटी आढळून आली आहेत. रविवारी येथे प्रसादासाठी आलेल्या भक्तांना याविषयी विचारणा केली असता पुजारी बाबानी गांजा लावला असल्याचे सांगितले. पुजाºयाला याविषयी विचारणा केली असता त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया देणे टाळले. या ठिकाणी गांजा लागवड केल्याची माहिती इंदिरानगर व तुर्भे नाक्यावरील अनेक नागरिकांना आहे. रविवारी येथे गांजा ओढण्यासाठी आलेल्या व्यक्तीला गांजा हवा आहे, आणून देणार का, असे विचारले असता त्याने लगेच होकार दिला. येथे फक्त गांजा ओढण्यासाठी येतात. विक्री इंदिरानगरमध्ये व नाक्यावर लालीकडे सुरू आहे. त्या व्यक्तीने ५० रुपयांमध्ये गांजाची पुडी आणून दाखविली.

पोलिसांचे भय नाही
च्शहरात आतापर्यंत गांजाच्या विक्रीचे अड्डे होते. पण आता गांजाची लागवड करण्याचे प्रकार समोर येवू लागले आहेत. हिरादेवी मंदिर परिसरामध्ये गांजाची लागवड केल्याचे ‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये निदर्शनास आले आहे.
च्पोलिसांकडून कारवाई होत नसल्यानेच गांजा लागवड करण्यासाठी मनोबल वाढल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

कारवाईकडे दुर्लक्ष
नवी मुंबईमधील गांजा सेवनासाठीचा सर्वात मोठा अड्डा हिरादेवी मंदिर परिसरामध्ये सुरू आहे. बिनधास्तपणे उघड्यावर गांजा ओढणाºयांची मैफल बसलेली असते. गांजाचा उग्र वास परिसरामध्ये पसरत असून येथून ये - जा करणाºयांना नाकावर हात ठेवूनच प्रवास करावा लागत आहे. सर्वांना माहिती असलेल्या या अड्ड्याकडे पोलीस दुर्लक्ष करत असून काहीही कारवाई करत नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

तक्रार करण्याची भीती
तुर्भे नाका व इंदिरानगर परिसरामध्ये अवैध व्यवसायाविरोधात यापूर्वी भाजपाचे पदाधिकारी सुरेश गायकवाड यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. पोलिसांनी तक्रारीनंतर जुजबी कारवाई केली व संबंधितांना गायकवाड यांच्या तक्रारीवरून कारवाई केल्याचे सांगितले. यामुळे परिसरातील नागरिकांना तक्रार करण्याची भीती वाटत आहे. पोलीस कडक कारवाईऐवजी आपलेच नाव अवैध व्यवसाय करणाºयांना सांगतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.
 

Web Title:  Large number of ammunition sold in Indiranagar along with Turbhe Naka, the biggest hawk in MIDC MIDC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.