नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये सोमवारी कोरोनाचे १४ नवीन रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू झाला आहे. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या १४५ झाली आहे. सलग दुस-या दिवशी मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरात रविवारी २३ रुग्ण आढळले होते. सीवूड सेक्टर ५० मध्ये एकाच घरातील ९ जणांना बाधा झाली होती. त्या घरातील अजून चौघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून या कुटुंबातील रुग्णांची संख्या १३ झाली आहे. जुईनगर सेक्टर २३ मधील मधील पोलीस कर्मचाºयाच्या घरातील दोन महिलांना व सेक्टर २४ मधील बेस्टच्या वाहकालाही कोरोना झाला आहे. सोमवारी बेलापूरमध्ये ४, नेरूळमध्ये ३, कोपरखैरणेत ३, घणसोली व दिघामध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत.दिघामधील ४२ वर्षांच्या व्यक्तीला हृदयविकाराचा त्रास झाल्यामुळे कळवा येथील रुग्णालयात दाखल केले होते. तेथून दुसºया रुग्णालयात नेताना तीव्र झटका येऊन त्याचा मृत्यू झाला. शहरात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 4:34 AM