CIDCO Lottery: पसंतीच्या घरासाठी आज सिडकोकडून शेवटची संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 06:32 IST2025-01-31T06:32:43+5:302025-01-31T06:32:53+5:30
CIDCO Lottery 2025 Last Date: ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोच्या संबंधित विभागाने केले आहे.

CIDCO Lottery: पसंतीच्या घरासाठी आज सिडकोकडून शेवटची संधी
CIDCO Lottery 2025 Last Date: पसंतीचे घर निवडून अनामत रक्कम भरण्यासाठी आज, शुक्रवारची शेवटची मुदत आहे. त्यानंतर मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे सिडकोच्या संबंधित विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पसंतीचे घर निवडलेल्यांसाठी अनामत रक्कम भरण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सिडकोच्या संबंधित विभागाने केले आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २६ हजार घरांची योजना आणली आहे. याअंतर्गत दीड लाखापेक्षा अधिक ग्राहकांनी ऑनलाइन अर्जाची नोंदणी केली आहे. त्यानंतर पसंतीचे घर निवडून अनामत रकमेचा भरणा करणे आवश्यक आहे. गुरुवारपर्यंत जवळपास १७ हजार ग्राहकांनी अनामत रकमेचा भरणा करून संगणकीय सोडतीच्या टप्प्यात पात्रता सिद्ध केली आहे. तर पसंतीचे घर निवडूनही १३ हजार अर्जदारांनी अद्याप अनामत रकमेचा भरणा केलेला नाही.
शेवटच्या दिवसांत यातील दोन ते तीन हजार अर्जदार अनामत रकमेचा भरणा करतील, असा विश्वास सिडकोने व्यक्त केला आहे.