नवी मुंबई: सिडकोने जाहीर केलेल्या गृहप्रकल्पातील घरांचे अर्ज भरण्यासाठी शेवटचे पाच दिवस उरले आहेत. यातच गणरायाचे आगमन होत असल्याने उर्वरित दिवसांत अर्ज भरणाऱ्यांची तारांबळ उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, आतापर्यंत सुमारे ८0 हजार अर्ज दाखल झाले आहेत. पुढील चार दिवसात हा आकडा लाखाच्या घरात जाईल, असा अंदाज सिडकोकडून व्यक्त करण्यात आला आहे.आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्पउत्पन्न गटासाठी सिडकोने १४,८३८ घरांचा मेगा गृहप्रकल्प जाहीर केला आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला, तर स्वातंत्र्यदिनापासून आॅनलाइन अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. १६ सप्टेंबर अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या संकेतस्थळाला आतापर्यंत २ लाख ३0 हजार ५00 नागरिकांनी भेट दिली आहे, तर दीड लाखापेक्षा अधिक जणांनी नोंदणी केली आहे. यापैकी १ लाख २९ हजार ग्राहकांनी प्रत्यक्ष अर्ज दाखल केले आहेत. यातील ७९ हजार ६६४ अर्जदारांनी शुल्क भरून अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. अर्ज भरण्याची शेवटची मुदत १६ सप्टेंबर २0१८ पर्यंत आहे. त्यामुळे आता अर्ज भरण्यासाठी केवळ पाच दिवस शिल्लक आहेत.विशेष म्हणजे १३ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरूवात होत आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात अर्ज भरणाºयांची तारांबळ उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिडकोने अगदी शेवटच्या टप्प्यात अर्ज भरण्यासाठी मोबाइल अॅप विकसित केले आहे. या अॅपमुळे अर्ज भरणे अधिक सुलभ होणार आहे.>अपात्र ठरलेल्यांना डिसेंबरमध्ये आणखी संधीशहराच्या पाच नोडमध्ये ११ कॉम्प्लेक्सच्या माध्यमातून १४,८२0 घरांचे काम सुरू करण्यात आले आहे. पुढील दोन वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे पात्र ठरलेल्या ग्राहकांना सहा हप्त्यात घरांचे पैसे भरता येणार आहेत.या गृहप्रकल्पातील सदनिकांसाठी प्राप्त झालेल्या पात्र अर्जदारांची २ आॅक्टोबर रोजी संगणकीय सोडत काढली जाणार आहे. विशेष म्हणजे यानंतर लगेच म्हणजेच डिसेंबर महिन्यात विविध घटकांसाठी ४0 हजार घरांची घोषणा करण्याच्या तयारी सिडकोने चालविली आहे.त्यामुळे या गृहप्रकल्पात अपयशी ठरलेल्या अर्जदारांना आणखी एक संधी प्राप्त होणार आहे. डिसेंबरमध्ये जाहीर होणाºया गृहप्रकल्प सदनिकांच्या नोंदणी अर्जासाठी सुध्दा मोबाइल अॅपचा वापर करता येणार आहे.
अर्ज भरण्यासाठी शेवटचे पाच दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 2:21 AM