रिक्षा मीटर रिकॅलिब्रेशनचे काम अंतिम टप्प्यात
By admin | Published: August 26, 2015 12:19 AM2015-08-26T00:19:15+5:302015-08-26T00:19:15+5:30
सुधारित भाडेवाढीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व रिक्षा मीटरचे रिकॅलिब्रेशन करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून या कामाने वेग घेतला असून रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया जवळजवळ
नवी मुंबई : सुधारित भाडेवाढीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व रिक्षा मीटरचे रिकॅलिब्रेशन करण्यात येत आहे. मागील काही दिवसांपासून या कामाने वेग घेतला असून रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया जवळजवळ अंतिम टप्प्यात आली आहे. असे असले तरी रिकॅलिब्रेशनची प्रक्रिया पूर्णत: सदोष असल्याचे काही प्रकरणातून समोर आले आहे.
वैधमापनशास्त्र विभागामार्फत मीटर रिकॅलिब्रेशन केले जात आहे. नवी मुंबईत एकूण १०,२०० अधिकृत रिक्षा आहेत. त्यापैकी आतापर्यंत ८६०० रिक्षा मीटरचे रिकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. उर्वरित काम पुढील पंधरा दिवसांत पूर्ण होईल, असा विश्वास संबंधित विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, रिकॅलिब्रेशन केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसांनी त्यात त्रुटी असल्याच्या रिक्षाचालकांच्या तक्रारी आहेत. योग्यरीत्या रिकॅलिब्रेशन न झाल्याने रिक्षाचालकांना ही प्रक्रिया पुन्हा करावी लागत आहे. त्याचा नाहक भुर्दंड संबंधित रिक्षाचालकांना सहन करावा लागत आहे. आतापर्यंत अशाप्रकारच्या चाळीस ते पन्नास तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यासंदर्भात संबंधित विभागाला माहिती देण्यात आल्याचे रिक्षा महासंघाचे अध्यक्ष कासम मुलाणी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)