मयतांची हजेरी लावणारे अखेर निलंबित

By admin | Published: December 22, 2016 05:25 AM2016-12-22T05:25:30+5:302016-12-22T05:25:30+5:30

तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायतीत रोजगार हमीच्या मस्टरवर मयतांची हजेरी लावून ते पैसे हडप करणे, तर काही रस्तेच न करता

The last time suspended attendance is finally suspended | मयतांची हजेरी लावणारे अखेर निलंबित

मयतांची हजेरी लावणारे अखेर निलंबित

Next

विक्रमगड : तालुक्यातील खुडेद ग्रामपंचायतीत रोजगार हमीच्या मस्टरवर मयतांची हजेरी लावून ते पैसे हडप करणे, तर काही रस्तेच न करता कागदोपत्री दाखवून त्याचेही पैसे हडप करणे या प्रकरणी दोषी ठरवून पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी व्ही. के. गायकवाड व संदीप घेगड या दोन ग्रामसेवकाना निलंबित केले. या बाबत त्याना पंचायत समिती कडून आदेश ही बजावण्यात आले असल्याचे गट विकास अधिकारी यांनी लोकमतला सागितले. या संपूर्ण भ्रष्ट्राचाराबाबत लोकमतने सातत्याने आवाज उठवला होता. याबाबत जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून चौकशी अहवाल मागवला होता. पंचायत समितीकडून चौकशी झाली होती. हा गैरव्यवहार झाला त्यावेळी ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणाऱ्या या दोन ग्रामसेवकांना अखेर जि.प.ने निलंबित केले आहे. या चौकशीचा अहवाल पंचायत समितीने जिल्हाअधिकारी कार्यालयाकडे पाठविला होता. व्ही. के. गायकवाड, संदीप घेगड, या दोन ग्रामसेवकांनी कार्यकाळात कामात अतिशय हलगर्जी व बेजबाबदारी केल्याचा ठपका ठेवून जिल्हा परिषद पालघारच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधि चौधरी यांनी त्यांना निलंबित केले आहे. खुडेद ग्रामपंचयतीमधे रोजगार हमी योजनेत झालेला भ्रष्टाचार हा फक्त प्रतिनिधिक स्वरूपाचा आहे. तालुक्याच्या रोहयोचाच पूर्ण बोजवारा उडालेला आहे अशी माहिती सचिन भोईर यांनी दिली.(वार्ताहर)
आयुक्तांना निवेदन देणार
खेडेद रोजगार हमी प्रकारणात दोन ग्रामसेवकाना निलंबित केले असले तरी या प्रकरणात सहभाग असणार्या पोस्टाचा,पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी आदिवासी विद्यार्थी कृती समितीचा जव्हार शाखेने केली आहे. तसेच या बाबत आदिवासी विद्यार्थी कृती समितीच्या मार्फत दोषिवर फौजदारी गुन्हे व कडक कारवाई करण्यासाठी कोकण विभागीय आयुक्त याना निवेदन देणार आसल्याचे नडगे यानी सांगितले.
खुडेद गावातील रोजगार हमी योजनेतील प्रकरणी दोन ग्रामसेवकाना निलंबित करण्यात आले आहे. या गैरव्यावहारा बाबत पुढील चौकक्षी चालु आहे. तसेच आमचा कडे तालुक्यातील इतर ग्रामपंचायतचा ही तक्र ारी आल्या आहेत. त्याची चौकक्षी करमन आम्ही चौकशी अहवाल वरीष्ठ कार्यालयाकडे पाठवनार आहोत
- प्रदीप डोलारे, बिडीओ
गेल्या आठ महिन्यांपासून आम्ही येथे रोजगार हमी योजनेत झालेल्या भ्रष्टाचारविरुध्द लढत आहोत. वृत्तपत्रांनी बातमी लाऊन धरताच अखेर चौकशीला सुरवात केली होती. आज अखेर दोन ग्रामसेवकाना निलंबित केले असले तरी या प्रकरणात दोषी पोस्टाचा, पंचायत समिती, ग्रामपंचायतचा अधिकाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा.
-लहू नडगे, कृती समिती

Web Title: The last time suspended attendance is finally suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.