भारताची महत्त्वकांक्षी चांद्रयान 3 मोहीमचे फडके नाट्यगृहात प्रक्षेपण

By वैभव गायकर | Published: August 23, 2023 07:41 PM2023-08-23T19:41:52+5:302023-08-23T19:42:07+5:30

भारताचा चांद्रयान-3 या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. भारताच्या

Launch of India's ambitious Chandrayaan 3 mission at Phadke theater | भारताची महत्त्वकांक्षी चांद्रयान 3 मोहीमचे फडके नाट्यगृहात प्रक्षेपण

भारताची महत्त्वकांक्षी चांद्रयान 3 मोहीमचे फडके नाट्यगृहात प्रक्षेपण

googlenewsNext

पनवेल: आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वकांक्षी चांद्रयान- 3 मोहीमचे(chandrayaan ३) आज दि.23 रोजी पनवेल महानगरपालिकेने आज रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात चांद्रयान 3 स्पेसक्राफ्ट चांद्रभूमीला स्पर्श प्रक्षेपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.शालेय विद्यार्थ्यांनी या प्रेक्षपणाचा आनंद घेतला.  यावेळी महापालिकेचे सर्व उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारताचा चांद्रयान-3 या महत्त्वाकांक्षी चंद्रमोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या इस्रोच्या (ISRO) चांद्रयान-3 (Chandrayaan-3 Mission) चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं आहे. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यारिता आयुक्त  गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार फडके नाट्यगृहामध्ये मोठ्या स्क्रीनवरती प्रक्षेपण करण्यात आले.

सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी चांद्रयानचे यशस्वी लॅण्डिंग होताच टाळ्यांचा गडगडाट करुन आनंद व्यक्त केला.  चौकट महापालिकेच्या १०शाळांमध्येही डिजीटल बोर्डवरती चांद्रयान- ३ स्पेसक्राफ्ट चांद्रभूमीला स्पर्श प्रक्षेपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळेतील मुलांनीही चांद्रयानाचे यशस्वी लँडिंग होताना पाहण्याचा आनंद घेतला.

Web Title: Launch of India's ambitious Chandrayaan 3 mission at Phadke theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.