नवी मुंबई : महानगरपालिकेने कोपरखैरणे सेक्टर १० मध्ये महिला सक्षमीकरण केंद्र उभारले आहे. दोन कोटी ८५ लाख रुपये खर्च करून उभारलेल्या केंद्राचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने महिला सक्षमीकरणासाठी विविध योजना, उपक्र म राबवून ठोस काम केले जात असून, महिला सक्षमीकरण केंद्राच्या माध्यमातून महिलांना एकत्र येण्यासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध होत असल्याचे महापौर जयवंत सुतार यांनी स्पष्ट केले. केंद्र लवकर कार्यान्वित करून या ठिकाणी विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्र म, उपयोगी उपक्र म राबविण्यास सुरुवात केली जाईल. महिलांनी निर्मिलेल्या विविध साहित्य विक्र ीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात येईल, अशा शब्दात आपले मनोगत व्यक्त केले. आमदार संदीप नाईक यांनी नवी मुंबई शहराने नेहमीच नावाप्रमाणे नव्या गोष्टींना प्राधान्य दिले असून, महिलांचे सक्षमीकरण करताना जागतिक पातळीवरील बदलांचा अंदाज घेऊन त्याला साजेसे प्रशिक्षण कार्यक्र म, योजना, उपक्र म राबवावेत, असे सूचित केले. स्थानिक नगरसेवक रामदास पवळे यांनी आपल्या प्रभागात एक चांगली वास्तू उपलब्ध होत असल्याचा आनंद व्यक्त करीत महिला भगिनींनी त्याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करून घ्यावा, असे आवाहन केले.
सेक्टर १०, कोपरखैरणे येथे रामचंद्र नाईक चौकाशेजारी डी-मार्ट जवळ भूखंड क्र. ९ वर मोक्याच्या ठिकाणी दोन कोटी ८५ लाख रुपये खर्च करून, ही तीन मजली महिला सक्षमीकरण वास्तू उभारली आहे. पालिकेच्यावतीने सेक्टर १०, कोपरखैरणे येथे भूखंड क्र. ९ वर उभारलेल्या तीन मजली महिला सक्षमीकरण केंद्र इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते मनोगत व्यक्त करीत होते. या वेळी परिवहन समिती सभापती रामचंद्र दळवी, लता मढवी, नगरसेवक लीलाधर नाईक, रमेश डोळे, भारती पाटील, संगीता म्हात्रे, मारुती सकपाळ, कोंडीबा तिकोने, रविकांत पाटील, इंदुमती तिकोने, सहायक आयुक्त अशोक मढवी, कार्यकारी अभियंता संजय देसाई उपस्थित होते.