आघाडीचे जागावाटप जाहीर

By Admin | Published: May 4, 2017 06:20 AM2017-05-04T06:20:00+5:302017-05-04T06:20:00+5:30

महापालिका निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्ष, काँगे्रस व आघाडीचे जागावाटप जाहीर झाले आहे. शेतकरी

Leader of the Alliance | आघाडीचे जागावाटप जाहीर

आघाडीचे जागावाटप जाहीर

googlenewsNext

नवी मुंबई : महापालिका निवडणुकीसाठी शेतकरी कामगार पक्ष, काँगे्रस व आघाडीचे जागावाटप जाहीर झाले आहे. शेतकरी कामगार पक्ष सर्वाधिक ४८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. काँगे्रस १८ व राष्ट्रवादी १२ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी जागावाटपावरून युतीमध्ये एकमत झाले नाही. यामुळे शिवसेना व भाजपाने स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या वतीने आदेश बांदेकर, ठाणेचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. भारतीय जनता पक्षानेही आरपीआयला सोबत घेऊन सर्व जागा लढण्याची तयारी सुरू केली आहे; परंतु शेतकरी कामगार पक्ष, राष्ट्रवादी व काँगे्रसने पंचायत समिती, जिल्हा परिषदेप्रमाणे महापालिका निवडणुकीमध्येही आघाडी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तीनही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन जागावाटपावर शिक्कामोर्तब केले आहे. शेतकरी कामगार पक्षाची महापालिका क्षेत्रामध्ये संघटनात्मक बांधणी चांगली असल्याने त्यांना सर्वाधिक ४८ जागा देण्यात आल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी व काँगे्रस लढणार आहे. आघाडीविषयी माहिती देताना शेकापनेते विवेक पाटील यांनी सांगितले की, यापूर्वी आम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्रितपणे लढल्या आहेत. या निवडणुकीमध्ये उरणसह पनवेलमध्ये भाजपाच्या अनेक उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली गेली आहे. महापालिका निवडणुकीमध्येही पूर्ण ताकदीने आघाडी काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
आघाडीच्या वतीने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या राज्यातील मोठ्या नेत्यांच्या सभा आयोजित केल्या जाणार आहेत. काँगे्रसचे सर्व माजी मुख्यमंत्री व महत्त्वाच्या नेत्यांना प्रचारासाठी बोलावण्यात येणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही प्रचारासाठी बोलावण्यात येणार असल्याची माहिती विवेक पाटील यांनी दिली आहे.
विकासाच्या मद्द्यांबरोबर भारतीय जनता पक्षाच्या येथील आमदारांच्या अपयशाबरोबर केंद्र व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसह इतर घटकांचे प्रश्न सोडविण्यात आलेल्या अपयशाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Leader of the Alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.