उरणमध्ये आवरे-पनवेल एसटी अपघातात २१ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 05:06 AM2018-08-29T05:06:14+5:302018-08-29T05:06:35+5:30

आवरे-पनवेल एसटीला गव्हाणफाट्याजवळ मंगळवारी अपघात झाला. सुदैवाने बस एका झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली.

At least 21 people were injured in the accident in Ore Panvel | उरणमध्ये आवरे-पनवेल एसटी अपघातात २१ जखमी

उरणमध्ये आवरे-पनवेल एसटी अपघातात २१ जखमी

Next

उरण : आवरे-पनवेल एसटीला गव्हाणफाट्याजवळ मंगळवारी अपघात झाला. सुदैवाने बस एका झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, अपघातात २१ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघात झाल्याचे समजताच, इतर वाहनांतील प्रवाशांनी बसमधील जखमींना बाहेर काढले आणि ताबडतोब कळंबोलीतील एमजीएम आणि पनवेल येथील रुग्णालयात दाखल केले. कळंबोली येथील रुग्णालयात १७ तर पनवेल येथे चार जखमींना उपचारासाठी दाखल केले आहे. या बसमधून कॉलेजचे विद्यार्थी आणि रुग्णालयात उपचारासाठी जाणारे प्रवासी जास्त संख्येने होते.

आवरे गावातून ही बस (एमएच-२० बीएल-०९९७३) पनवेल आगाराकडे निघाली होती. बसमध्ये ४५ प्रवासी होते. गव्हाणफाट्याच्या पुढे उतरणीवर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बस एका आंब्याच्या झाडाला धडकली. धडकेमुळे गाडीत बसलेल्या प्रवाशांच्या तोंडाला, डोक्याला जबर मार बसला. बसमधील २१ प्रवाशांना उपचारासाठी एमजीएम आणि पनवेल येथे दाखल करण्यात आले होते. काही प्रवाशांना खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले. एमजीएम कळंबोली रुग्णालयात शीतल गोंधळी (१८), मनीषा घोलप (६०), प्रशांत म्हात्रे (४०), साक्षी रेवसकर (१६), रितेश कांबळे (१९), सोनम कांबळे (२२), जयवंत म्हात्रे (६७), अनसूया म्हात्रे (६५), प्रवीण म्हात्रे (४१), रघुनाथ नागावकर(६०), कमलाकर कोळी (६६), दत्तात्रेय डाकी (५८), राजाराम पाटील (५४), उषा म्हात्रे (५९), सुधीर म्हात्रे (३४), स्वानंद नवाळे (२८) यांना दाखल करण्यात आले आहे.
बसचा ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याचे चालक एस.एम. कोलाटे यांचे म्हणणे आहे. मात्र, पनवेल पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. एसटी महामंडळाकडून जखमींना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी एक हजार रुपये देण्यात आल्याची माहिती स्थानक प्रमुख डी. के. म्हात्रे यांनी दिली. तसेच ज्या प्रवाशांना जास्त खर्च आला असेल त्यांना देखील नंतर मदत देण्यात येईल, असे सांगितले.

Web Title: At least 21 people were injured in the accident in Ore Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.