जागतिक पुस्तक दिनी उनपच्या माॅसाहेब मिनाताई ठाकरे वाचनालयात व्याख्यान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 09:15 PM2023-04-23T21:15:21+5:302023-04-23T21:15:38+5:30

पुस्तकाचे महत्त्व जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जातो.

Lecture on World Book Day at Masaheb Minatai Thackeray Library | जागतिक पुस्तक दिनी उनपच्या माॅसाहेब मिनाताई ठाकरे वाचनालयात व्याख्यान

जागतिक पुस्तक दिनी उनपच्या माॅसाहेब मिनाताई ठाकरे वाचनालयात व्याख्यान

googlenewsNext

मधुकर ठाकूर 

उरण : पुस्तके आणि वाचनाचे महत्व पटवून देण्यासाठी रविवारी (२३) जागतिक पुस्तक दिना निमित्त उरण नगरपरिषदेच्या माॅसाहेब मिनाताई ठाकरे वाचनालय  मुख्याधिकारी राहूल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष पवार, ग्रंथपाल आणि सहकारी  जयेश वत्सराज यांनी वाचनालयात नियमित येणारे विद्यार्थी आणि वाचक यांच्या उपस्थितीत हेमंत कांबळे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. 

 प्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर यांचा जन्म २३ एप्रिल १५६४ रोजी झाला रोजी झाला. तर २३ एप्रिल १६१६ रोजी त्यांचे निधन झाले. योगायोग म्हणजे अनेक जागतिक कीर्तीच्या नामवंत कवी, लेखक , यांची पुण्यतिथी अथवा जयंती याच दिवशी येत असल्यामुळे " युनेस्को" ने १५ नोव्हेंबर १९९५ रोजी ग्रीस येथे झालेल्या परिषदेमध्ये २३ एप्रिल हा दिवस " जागतिक पुस्तक दिवस " म्हणून करण्याचे ठरविले आणि २३ एप्रिल १९९६ रोजी पहिला जागतिक पुस्तक दिवस साजरा झाला. पुस्तकाचे महत्त्व जनमानसावर बिंबवण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जातो.

 या निमित्ताने हेमंत कांबळे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. "पुस्तक आणि वाचन"  हे  हेच मनुष्याच्या " गतीचे व प्रगतीचा आधार आहे." असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत असे व्याख्यात्यांनी सांगितले.यानंतर वाचनालयातील  विद्यार्थ्यांनीही  आपली मनोगते व्यक्त केली.  जागतिक पुस्तक दिन  उत्साहवर्धक वातावरणामध्ये पार पडण्यात आला. 

या कार्यक्रमाला निवृत्त मुख्याध्यापक पी. डब्ल्यू. पाटील , माजी सैनिक जयेश पाटील,  निवृत्त शिक्षक चौधरी , ज्येष्ठ नागरिक गजानन जुवेकर  तसेच  इम्रान खान, रूची गुप्ता, सायली सात्विलकर, रोहीत प्रसाद, रजत रंजन, ज्ञानेश्वर कदम, शुभम गौडदाब, अजित आपटे आदी विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: Lecture on World Book Day at Masaheb Minatai Thackeray Library

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.