कुष्ठरूग्णांना मिळणार "२५०० निर्वाह भत्ता, रूग्णांना नियमित औषध पुरविण्यात येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 02:25 AM2017-11-24T02:25:02+5:302017-11-24T02:25:12+5:30

नवी मुंबई : पनवेलमधील कुष्ठरुग्णांच्या समस्येवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे.

Leprosy patients will get 2500 regular allowance, regular medicines for patients | कुष्ठरूग्णांना मिळणार "२५०० निर्वाह भत्ता, रूग्णांना नियमित औषध पुरविण्यात येणार

कुष्ठरूग्णांना मिळणार "२५०० निर्वाह भत्ता, रूग्णांना नियमित औषध पुरविण्यात येणार

Next

नवी मुंबई : पनवेलमधील कुष्ठरुग्णांच्या समस्येवर ‘लोकमत’ने प्रकाश टाकताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आरोग्य विभागाने रुग्णांची भेट घेऊन त्यांना औषधांचा पुरवठा केला आहे. सर्वसाधारण सभेनेही प्रतिमहिना २५०० रुपये निर्वाह भत्ता देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
येथील श्री गणेश कुष्ठरोग वसाहतीमधील रुग्णांची चार दशकांपासून परवड सुरू आहे. रुग्णांना वेळेत औषधे मिळत नाहीत. वसाहतीमध्ये प्राथमिक सुविधा मिळत नाहीत. ‘लोकमत’ने १८ नोव्हेंबरच्या अंकामध्ये ‘पनवेलमधील कुष्ठरुग्णांची परवड’ या शीर्षाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांनी वस्तीमध्ये जाऊन रुग्णांची भेट घेतली. सर्वांना अत्यावश्यक औषधांचे किट व चप्पट दिली. प्रत्येक १५ दिवसांनी रुग्णांना औषधांचा साठा उपलब्ध करून दिला जाणार आहे. आरोग्य विभागाने दखल घेतल्यामुळे व आवश्यक औषधांचा साठा मिळाल्याने रुग्णांनी व त्यांच्या नातेवाइकांनी ‘लोकमत’चे आभार मानले आहेत.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये बांधकाम समिती सभापती अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी कुष्ठरुग्णांना २५०० रुपये निर्वाह भत्ता मिळण्याविषयी प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव पालिकेने मंजूर केला. गुरुवारी महापालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन, सुधारणा व सामाजिक विकास सभापती प्रकाश बिनेदार व बांधकाम सभापती मनोज भुजबळ यांनी मालधक्का परिसरातील श्री गणेश कुष्ठरोग वसाहतीमध्ये पाहणी दौरा केला. पालिकेचे अधिकारीही उपस्थित होते. परिसरातील समस्या सोडविण्याच्या सूचना प्रशासनास केल्या. निर्वाह भत्त्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी महापौर कविता चौतमोल, सभागृहनेते परेश ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर यांच्यासह पालिकेचे आभार मानले आहेत.
>सर्वाधिक निर्वाह भत्ता देणारी पालिका
कुष्ठरूग्णांना निर्वाह भत्ता देण्याविषयी परिपत्रक शासनाने यापूर्वीच काढले आहे. कल्याण-डोंबिवली, पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिका निर्वाह भत्ता देत आहेत. पनवेल महापालिकेने २५०० रूपये भत्ता देण्याचा प्रस्ताव मंजूर केला असून, एवढा भत्ता देणारी पनवेल पहिली महापालिका ठरणार आहे.
>आरोग्य विभागाचे कर्मचारी कुष्ठरोग वसाहतीमध्ये आले होते. त्यांनी औषधांचे किट व रूग्णांसाठी आवश्यक चप्पल दिली आहे. प्रत्येक १५ दिवसांनी औषधांचा साठा देण्याचे आश्वासन दिले आहे.
- छबिबाई आंबेकर, रूग्ण
कुष्ठरूग्ण वसाहत माझ्या प्रभागात आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी नियमित पाठपुरावा केला आहे. त्यांना निर्वाह भत्ता देण्याविषयी प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडला व मंजूरही झाल्याने रूग्णांना दिलासा मिळणार आहे.
- अ‍ॅड. मनोज भुजबळ, सभापती,
बांधकाम समिती, पनवेल महापालिका

Web Title: Leprosy patients will get 2500 regular allowance, regular medicines for patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.