शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

नेरूळमध्ये मालदिवमध्ये आढळणाऱ्या दुर्मिळ सागरी पक्षी लेसर नॉडीचा मृत्यू

By नारायण जाधव | Published: July 15, 2024 1:41 PM

महापालिका पशु रुग्णालयाला उशीर नको, पर्यावरणप्रेमींची मागणी.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : भारतात क्वचितच दिसणारा मालदीवचा सागरी पक्षी ए लेसर नॉडी रविवारी सीवूड्स एनआरआय कॉम्प्लेक्समध्ये दिसला, पण तो  वाचला नाही. शास्त्रीय नाव असलेला ‘ॲनस टेन्युरोस्ट्रिस’ हा पक्षी लांब चोचीने धडपडताना दिसत होता, असे एनआरआय कॉम्प्लेक्सचे रहिवासी दीपक रामपाल यांनी सांगितले, ज्यांनी वन्यजीव कल्याण संघटनेशी (डब्ल्यूडब्ल्यूए) संपर्क साधला.

पाहुण्या पक्ष्याला डब्लूडब्ल्यूए वन्यजीव पुनर्वसन केंद्र मानपाडा, ठाणे येथे नेले, जे सुमारे 30 किमी दूर आहे.   दुर्दैवाने पक्ष्याला वाचवता आले नाही, असे डब्लूडब्ल्यूएचे बचावकर्ते सनप्रीत सावर्डेकर आणि मयूर दळवी यांनी सांगितले. “यातून नवी मुंबईत पशुवैद्यकीय रुग्णालय सुरू करण्याची निकड आहे,” असे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार म्हणाले, ज्यांनी नवी मुंबईतील फ्लेमिंगोसह अनेक पक्ष्यांच्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त केली.

महापालिकेची जुईनगर येथील रूग्णालयाची चार कोटी रुपये खर्चून बांधलेली इमारत तीन वर्षांपासून तयार असूनही कार्यान्वित नाही. मनपा प्राण्यांच्या रुग्णालयात अंतर्गत बदल करण्यासाठी सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला, परंतु नॅटकनेक्टने सांगितले की, नवी मुंबई महापालिका  ठाणे, मुंबई आणि पनवेल या शेजारच्या महापालिकांशी किंवा राज्याच्या पशुवैद्यकीय विभागाशी मदतीकरिता संपर्क साधू शकते. हे धक्कादायक आहे की 21 व्या शतकातील शहराच्या महापालिकेने शहरासाठी लागणाऱ्या सर्व घटकांसाठीच्या सुविधांवर यापूर्वी  काम केले नाही आणि आता ते बदल करण्यासाठी सल्लागारांना बोलवत आहेत, कुमार असा  खेद कुमार यांनी व्यक्त केला.

पक्ष्यांव्यतिरिक्त, अनेक पाळीव प्राणी आणि भटके प्राणी आजारी पडतात, अपघातात जखमी होतात आणि ते वैद्यकीयदृष्ट्या दुर्लक्षित होतात ही एक दुःखद परिस्थिती आहे, असे प्राणी कार्यकर्ते ज्योती नाडकर्णी यांनी सांगितले. 

दरम्यान, बीएनएचएसने हा पक्षी संशोधनासाठी वनविभागाकडून ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.  UNDP ने मालदीवमध्ये नॉडी संवर्धन कार्यक्रम सुरू केल्याचे पर्यावरण पहारेकरी नॅटकनेक्ट ने निदर्शनास आणले. मॉरिशियन वाइल्डलाइफ फाऊंडेशनच्या म्हणण्यानुसार हे समुद्री पक्षी महत्त्वाची सागरी पोषक तत्वे आणून जमिनीला सुपीक बनविण्यास मदत करतात. पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे वनस्पती आणि कीटकांची संख्या वाढण्यास मदत होते, त्यामुळे संपूर्ण अन्नसाखळीला मदत होते, असे फाउंडेशनने स्पष्ट केले आहे .“बेटांवरील समुद्री पक्ष्यांची उच्च घनता कोरल रीफसाठी देखील महत्त्वपूर्ण आहे, ज्याला ते खत देतात आणि ते मत्स्यपालनाच्या आरोग्यासाठी योगदान देतात. पक्षी हेदेखील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे,” असे UNDP ची वेबसाइट तात्याहवर म्हटले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई