आरटीओ कॅम्पकडे नागरिकांची पाठ

By admin | Published: January 12, 2017 06:06 AM2017-01-12T06:06:29+5:302017-01-12T06:06:29+5:30

वाहनाबाबतच्या विविध परवान्यांवर लागणारा कर २९ डिसेंबर रोजी सुमारे पाचपटीने वाढवण्यात आला. याची

Lessons of the citizens to the RTO camp | आरटीओ कॅम्पकडे नागरिकांची पाठ

आरटीओ कॅम्पकडे नागरिकांची पाठ

Next

दासगाव/महाड : वाहनाबाबतच्या विविध परवान्यांवर लागणारा कर २९ डिसेंबर रोजी सुमारे पाचपटीने वाढवण्यात आला. याची अंमलबजावणी मंगळवारपासून सुरू झाली. पाचपटीने कर वाढल्याने महाडच्या आरटीओ कॅम्पमध्ये शुकशुकाट पसरला होता. नागरिक कॅम्पमध्ये आले. मात्र, भरमसाठ वाढलेल्या फीमुळे आल्या पावली परतले.
महाडला दर महिन्याला रायगड आरटीओ मार्फत दोन कॅम्प घेण्यात येतात. प्रत्येक कॅम्पला सुमारे ६०० ते ७०० प्रकरणे हाताळली जातात. यामध्ये नवीन लायसन्स, गाड्या नावावर करणे, इतर कर भरणे आदी कामे के ली जातात. २९ डिसेंबर, २०१६ रोजी फिस अंडर मोटार व्हेईकल नियमाप्रमाणे कर बदल करण्यात आला. या कराची वाढ सुमारे पाचपटीपेक्षा जास्त असल्याने मंगळवारी सकाळी आरटीओ कॅम्पला नागरिकांनी हजेरी लावली. मात्र, कराची देय समजल्यानंतर सर्वांनीच पळ काढला. सकाळी ११ ते संध्याकाळी ६ असा पूर्ण दिवस चालणारा आरटीओ कॅम्प दुपारी १२ वाजताच बंद पडला. जुन्या नियमाप्रमाणे लर्निंग लायसन्स काढायचे असल्यास त्याची ३१ रुपये फी आकारण्यात येत होती. या फीमध्ये बदल करून आरटीओची १५० रुपये फी दोन वेगवेगळ्या चाचण्यांसाठी ३५० रुपये आणि सर्व्हिस टॅक्स, कृषी कल्याण टॅक्स असे मिळून ६.२० पै. असा कर लावण्यात आला. ही रक्कम ५०१ रु. होत आहे. पूर्वी ज्या ठिकाणी ३१ रु.मध्ये मिळणारे लर्निंग लायसन्स त्या ठिकाणी तब्बल ५०१ रुपयांना नागरिकांना पडणार आहे. अशाच प्रकारे इतर परवान्यांवर कर वाढल्याने नागरिकांनी महाडच्या आरटीओ कॅम्पकडे पाठ फिरवली. ( वार्ताहर)

Web Title: Lessons of the citizens to the RTO camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.