आठवडी बाजाराकडे शेतकऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:50 AM2018-04-24T00:50:11+5:302018-04-24T00:50:11+5:30
योग्य किंमत मिळत नसल्याची खंत
नवी मुंबई : शेतातील माल थेट बाजारात विकता यावा, याकरिता संत सावता माळी आठवडी बाजाराच्या माध्यमातून नवी मुंबईत ठिकठिकाणी महापालिकेच्या वतीने आठवडी बाजार सुरू करण्यात आले. मात्र, सद्य:स्थितीत शहरात बहुतांश ठिकाणी आठवडी बाजार बंद होण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र पाहायला मिळते आहे. आठवडी बाजारातही स्थानिक फळ, भाजीपाला विक्रेत्यांनी जागा अडविल्याने शेतकºयांना या ठिकाणी माल विक्री करणे अशक्य झाले आहे. स्थानिक विक्रेत्यांची अरेरावी, जागेवर केलेली अडवणूक, मालाला योग्य भाव न मिळाल्याने हे आठवडी बाजार बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
सीबीडी सेक्टर ३ येथील राजीव गांधी क्रीडा संकुलाशेजारी असलेल्या जागेवर दर शनिवारी आठवडी बाजार भरत असून, या ठिकाणी स्थानिक विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात जागा अडविल्याचे दिसून येते. शेतकºयांना या ठिकाणी शेतमाल विकता यावा, याकरिता माल घेऊन येतात. मात्र, स्थानिक विक्रेत्यांच्या अरेरावीपणामुळे या ठिकाणी शेतमाल विक्रीला पुरेसा वाव मिळत नसल्याची व्यथा शेतकºयांनी व्यक्त केली. सुरुवातीला काही महिने या ठिकाणी आठवडी बाजार या संकल्पनेला चांगलाच प्रतिसाद मिळाला. मात्र, हळूहळू ग्राहकांची संख्या रोडावल्याचे चित्र पाहायला मिळाले. बाजाराच्या मुख्य प्रवेशाच्या ठिकाणीच स्थानिक विक्रेते मालविक्रीसाठी जागा अडवून बसत असल्याने शेतकºयांना मात्र या ठिकाणी मालाच्या विक्रीसाठी पुरेशी संधी मिळत नसल्याचेही येथील शेतकºयांनी स्पष्ट केले. या ठिकाणी मालाच्या विक्रीकरिता येणाºया शेतकºयांची संख्या कमी होत असून, पुढील काही आठवड्यांत हे प्रमाण आणखी कमी होईल, असेही शेतकºयांनी स्पष्ट केले. नेरुळ, वाशी, सानपाडा परिसरातही अशीच परिस्थिती असून, काही आठवड्यांनी हे बाजार बंद होतील, असे चित्र पाहायला मिळत आहे. शेतकरीही या आठवडी बाजाराकडे पाठ फिरवत आहेत.