शिक्षणाधिका-यांना नेतृत्व विकासाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:44 AM2018-02-21T01:44:44+5:302018-02-21T01:44:44+5:30
शिक्षण अधिका-यांमध्ये शैक्षणिक नेतृत्व गुण विकसित व्हावा, याकरिता प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या वतीने कळंबोलीत तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे
कळंबोली : शिक्षण अधिका-यांमध्ये शैक्षणिक नेतृत्व गुण विकसित व्हावा, याकरिता प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या वतीने कळंबोलीत तीन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. मुंबई विभागातील अधिकाºयांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. संबंधितांना विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
सध्या महाराष्ट्रात प्रगत शिक्षण कार्यक्र म सुरू आहे. खासगी शिक्षण संस्था त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाच्या शाळेबरोबर स्पर्धा करण्यासाठी शासकीय शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याकरिता वेगवेगळे उपक्र म राबवले जात आहेत. प्रत्येक जिल्ह्यात तसेच तालुक्यात गुणवत्तेवर आधारित शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी यांच्यावर आहे. शिक्षणाधिकारी हे शिक्षक, केंद्रप्रमुख, शाळा समिती, पालक, विद्यार्थ्यांमधील समन्वयक असतात. शासनाच्या शैक्षणिक योजना, उपक्र म राबविण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते. ते किती प्रभावीपणे हे काम करतात. त्यावर तेथील शैक्षणिक प्रगती बºयाच अंशी अवलंबून असते. एकंदरच संबंधित अधिकारी शैक्षणिक पुढाकार घेत असतात. त्यामध्ये नेतृत्वगुण विकसित करण्याकरिता महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या वतीने मुंबई विभागीय तीन दिवसीय कार्यशाळा कळंबोली येथे मंगळवारपासून सुरू झाली.
रायगड, ठाणे, पालघर आणि मुंबईतील शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि सहभागी झाले होते. याकरिता सुनीता राठोड, सुनील अधिक या तज्ज्ञांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी शैक्षणिक नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्र मांतर्गत शैक्षणिक गुणवत्ता सुधारणा अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मौलिक वर्ग, खुले चर्चासत्र, अभिव्यक्ती विचार, शैक्षणिक नेतृत्व विकास कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. गुणवत्ता विकासासाठी पायाभूत बाबी कोणत्या, अधिकारी म्हणून पहिल्या तीन क्रमांकांमध्ये येण्याकरिता सादरीकरण, अनुभव, यशोगाथेचे सादरीकरण या वेळी करण्यात आले. उपसंचालक संघमित्रा त्रिभुवन यांनी प्रास्ताविक केले. विभागीय प्रशिक्षण समन्वयक लिंबाजी गीते यांनी उत्तम नियोजन केले.