शहरं
Join us  
Trending Stories
1
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत सत्तेत आलो असं छगन भुजबळ म्हणाले"; पुस्तकात खळबळजनक दावा
2
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
3
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
4
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
5
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
6
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
7
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
8
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
9
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
10
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
12
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
13
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
14
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
15
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
16
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
17
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
18
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
19
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
20
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा

‘निश्चय केला-नंबर पहिला’ चला, नवी मुंबईत सिद्ध करू या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 12:08 AM

अधिकारी वर्गापासून ते सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांची एकच लगबग सुरू आहे. ती म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी सज्ज हाेण्यासाठी.

आपलं आवडतं, लाडकं शहर नवी मुंबई एरव्ही नीट-नेटकं असतंच; पण सध्या या शहरात फिरताना एक चैतन्य संचारल्यासारखं वाटतं. रस्ते चकाचक हाेताहेत. रस्त्याकडेची फुटपाथ स्वच्छ दिसत आहेत. त्यापलीकडची झाडे- बुंधा रंगवून उभी आहेत. वाळलेले गवत निघून हिरवळ जागाेजागी दिसत आहे. पालिकेची सगळी माणसं काही ना काही करत आहेत. स्वच्छता, सजावट, रंगरंगाेटी.. जणू काही सण- समारंभ जवळ आला आहे. अधिकारी वर्गापासून ते सफाई कर्मचाऱ्यांपर्यंत सगळ्यांची एकच लगबग सुरू आहे. ती म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ साठी सज्ज हाेण्यासाठी. गेल्या वर्षी सबंध देशात तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या आपल्या नवी मुंबईला पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी!निश्चय केला, नंबर पहिला. ही घाेषणा सत्यात उतरविण्यासाठी आपल्याला जाणवतं की इथले रस्ते, भिंती, उड्डाणपूल, उद्यानं, स्वच्छतागृहे, बस थांबे आपल्याला काही सांगू पाहत आहेत, संवाद करू पाहत आहेत. नागरिकांना सहकार्यासाठी जणू आवाहन करीत आहेत. ‘जसं घर, तसं शहर’, आपले पाळीव प्राणी आपली जबाबदारी, Clener today better tomorrow, या सचित्र घाेषणा आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून देत आहेत. बाेले वसुंधरा दक्ष दक्ष, झाडे लावा लक्ष लक्ष, स्वच्छ, सुंदर परिसर, जीवन निराेगी निरंतर, तुमची वेग मर्यादा ठरवेल तुमच्या आयुष्याची मर्यादा यांसारखे सचित्र संदेशही अबालवृद्धांचे लक्ष वेधत आहेत. स्वयंचलित वाहनांमुळे हाेणारे पाेल्यूशन यावर सायकल चालवणे हेच साेल्यूशन, अशा अतिशय कल्पक आणि नाविण्यपूर्ण घाेषवाक्येही पहायला मिळतात. इथल्या रस्त्याकडेच्या भिंतींना सुटलेल्या, तुटलेल्या दगडांनाही रंगरंगाेटी केली असल्याने या म्हणीप्रमाणे Leave no stone uncloused असे म्हणत शहरातले कानेकाेपरेही रंगात न्हाऊन निघाले आहेत.काही ठिकाणी माेठ्या भिंतीवर सुंदर चित्र काढली आहेत. सयात वारली कला, आगरी काेळी संस्कृती, सबवेमधील त्रिमिती मत्स्यगंधा तर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. आपाेलाे हाॅस्पिटल सिग्नलजवळ निकामी झालेल्या टायर्सना रंगवून केलेले मांडणी शिल्प, आय लव्ह नवी मुंबई इन ऑरबिट व ग्रण्ड सेंट्रल माॅलमधील तरणाईला सुनावणारे सेल्फी पाॅईंट्स, सुकलेल्या, वठलेल्या झाडांच्या खाेडावर मधमाशा निर्माण करत असलेली षटकाेनी आकाराची घरं असलेलं मधाचं पाेळं तर सर्जनशीलतेचे अनाेखे अविष्कारच! यावर्षी या सजावटीत वेगळी भर म्हणजे कलात्मक विद्युत राेषणाई डाेळे भरून पहावी, अशीच म्हणावी लागेल. नवी मुंबईच्या रात्रीच्या साैंदर्याला एक झळाळी प्राप्त झाली आहे.सर्वेक्षणाच्या माहिती पुस्तिकेतील प्रत्येक मुद्यावर पालिकेतील अधिकारी व विशेषत: श्रमणारे कर्मचारी मेहनत घेताना दिसत आहेत. स्वच्छता घराची एकवेळ ठीक आहे; पण या अवाढव्य शहराची स्वच्छता म्हणजे किती महाकाय करावे लागेल, हे लक्षात येते. या कामात कचरा ही बाब प्रचंड भेडसावणारी, कितीही ताकद लावली, काळजी घेतली तरी नाहिशी हाेईल, असे नाही. नवी मुंबई पालिकेने कचरा विल्हेवाटीसाठी मात्र कंबर कसली, असे चित्र दिसते. ‘माझा कचरा, माझी जबाबदारी’ हे नागरिकांच्या गळी उतरवण्याचं अवघड काम चिकाटीनं सुरू आहे. घरातल्या कचऱ्याची विल्हेवाट प्रत्येक नागरिकाने लावण्याची जबाबदारी स्वीकारली तरच कचऱ्याच्या समस्येचा निचरा हाेणार आहे, हे ओळखून मी स्वत: स्त्री मुक्ती संघटनेनं तयार केलेली कंपाेस्ट बास्केट ९ वर्षांपासून मी वारताेय. त्या नियमित स्वयंपाक घरातला कचरा टाकताे. भाज्यांचे, काेथिंबीरीचे देठ लांब असतील तर ते कात्रीने बारीक कापून टाकताे. बास्केटबराेबर त्यांनी दिलेलं कल्चर आजपर्यंत या भाज्यांच्या सालीचं खत बनवत आलं आहे. हे कल्चर विरजण्यासारखं आहे. त्यात माेसंबीची, संत्र्याची सालं, आंब्याची मी जेव्हा त्यात टाकताे, काही दिवसांनी या खताला छानसा वास प्लेवरही येताे. हे मी स्वत: अनुभताे आहे. प्रश्न हा आहे की, आपल्याला त्याचा वास येताे का? चिलटे, किडे हाेतील का? अशा शंका मनात असतात. एकदा ताे माझा, मी केलेला कचरा आहे, हे स्वीकारलं की मग ते खतही सुगंधी वाटू शकतंं, पण मी मटार खाणार, कलिंगडाचा लाल गर चाखणार; मात्र त्याची सालं, टरफलं ही पालिकेनं बघावी, हा विचार साेडून दिला पाहिजे. या बराेबर घरातला सुका कचरा रिसायक्लिंगला गेला पाहिजे. टाेलची छाेटी पावती पुनर्पयाेगासाठी गेली पाहिजे. अनेकदा अनाठायी खर्च करणाऱ्यांना ६०० ते ८०० रुपयांची ८-१० वर्षे टिकणारी एक बास्केट विकत घेण्यासाठी काचकूच करताे, हे शक्य नसेल तर आपल्या साेसायटीत कचऱ्यापासून खत प्रक्रिया करण्यासाठी कंपाेस्ट पिटसुद्धा बनवता येते. अलिकडे दृष्टिकाेन बदलत चालला आहे. पर्यावरणाचा हा शाश्वत मार्ग आपण चाेखाळला पाहिजे, असे वाटून अनेक लाेक याकडे वळतात, एवढेच नव्हे तर घरातील निकामी वायर, केबल्स, माेबाइल, चार्जर्स, इयरफाेन्स इ अनेक प्रकारची गॅजेट्स आपण घरात वेगळा डबा करून साठवून शास्त्राेक्त पद्धतीनं विल्हेवाट लावण्याचीही जबाबदारी घेणे जरूरीचे आहे.                         -डाॅ. अजित मगदूम

खरे तर निसर्गाच्या शब्दकाेशात ‘कचरा’ हा शब्दच नाही. ताे माणसाने आणला. निसर्ग आपणाला भरभरून देताे. त्याची परतफेड आपण करताे का? राेज आपण २१००० वेळा श्वास घेताे. त्यातल्या प्राणवायुची किंमत काढायची झाली तर २१००० रुपये एवढी हाेते! नुकत्याच झालेल्या काेविड महामारीनं आपल्या ताेंडचं पाणी पळालं हाेतं. त्यात प्राणवायुची किंमत सर्वांना कळाली आहे. यापूर्वी आपल्याला प्राणवायु तपासतात, हे आपल्याला माहिती नव्हतं; पण आता ऑक्सिमीटर घराेघरी आलं, पाण्याच्या बाटल्या येतील, असं काही वर्षांपूर्वी वाटलं नव्हतं, तसंच आता घरात एअर प्युरिफायर येतील, काही वर्षांनी ऑक्सिजन पाऊच प्रत्येकाला राेज विकत घ्यावी लागतील.म्हणून निसर्गाचं जे ऋण आहे ते आपल्या बारिक सारीक कृतीतून फेडता आलं पाहिजे. स्त्री मुक्ती संघटनेनं गेली दाेन दशकं या क्षेत्रात काम केले आहे. घनकचऱ्याचा पुनर्वापर व ओल्या कचऱ्याची खतप्रक्रिया हे सूत्र घेऊन नवी मुंबई महापालिका प्रशासनासमाेर उपक्रम राबवत आहे. महापालिका आयुक्त यांच्या दृष्टिकाेनाला मानवी स्पर्श आहे. यातून महिला सक्षमीकरणाचं एक दमदार पाऊल आहे, असं म्हणता येईल. यातून डम्पिंग ग्राउंडवर कचरा जाणं हळूहळू संपुष्टात आलं तर पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यात हे याेगदान ठरेल. म्हणून स्वच्छ सर्वेक्षणाच्या या काळात महापालिका म्हटलं की तक्रारींचा पाढा वाचत बसण्यापेक्षा प्रशासनाला सकारात्मक प्रतिसाद देऊया. आपल्या शहराला याआधी ‘ईझ ऑफ लिव्हयाबिलिटी इंडेक्स’ नुसार भारतात राहण्यालायक शहरांमध्ये दुसरा क्रमांक मिळाला हाेता. पहिला नंबर ०.०९ हुकला हाेता. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये पहिला नंबर येण्यासाठी आपण प्रत्येक नागरिकांनी हाेईल तितकं याेगदान देऊया आणि आपल्या नवी मुंबई शहराचं नाव देशात अग्रगण्य करूया... 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान