शहरं
Join us  
Trending Stories
1
नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यात विधानसभा निवडणूक?; CM एकनाथ शिंदेंचे संकेत
2
मराठा आरक्षण: मंत्र्यांच्या शिष्टाईला यश; राजश्री उंबरे यांनी १४ दिवसांनंतर उपोषण केलं स्थगित
3
धनगर समाजाच्या मागणीवर राज्य सरकारचं मोठं पाऊल; धनगर आणि धनगड एकच असा GR काढणार
4
चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला, मग कपडे उतरवले आणि..., कोलकात्यातील आणखी एका रुग्णालयात धक्कादायक घटना  
5
Investment Tips : जाणून घ्या गुंतवणूकीची १८x१५x१० स्ट्रॅटजी; तुमचं मूल १८ व्या वर्षीच बनेल कोट्यधीश
6
आजीला पाहून खूश झाली राहा, टाळ्या वाजवत बोलताना दिसली; आलिया अन् रणबीरही पाहतच राहिले
7
बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या हत्येचा कोणी प्रयत्न का करत नाही?; एलन मस्क असं का म्हणाला?
8
Post Officeच्या कोणत्या स्कीमवर मिळेल 'अधिक' व्याज, गुंतवणूकीपूर्वी पाहा प्रत्येक योजनेचे इंटरेस्ट रेट
9
Bigg Boss Marathi 5 : "दम असेल तर तोंडावर बोल", निक्कीने संग्रामला सगळ्यांसमोरच दिली धमकी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार करणारा हल्लेखोर नेमका आहे कोण? धक्कादायक माहिती आली समोर 
11
अनन्या पांडेने वॉकर ब्लँकोसोबतच्या नात्यावर सोडलं मौन, म्हणाली - "मी एक..."
12
जेवढा प्रवास, तेवढाच टाेल; कशी आहे जीपीएसवर आधारित टाेल संकलन यंत्रणा?
13
PM नरेंद्र मोदी तिसऱ्या टर्ममध्ये आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेणार; लवकरच विधेयक आणणार?
14
लोकसभेला भाजप ३०३ वरून २४० वर कसा आला? नितीन गडकरींनी सांगितलं कारण
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा प्रयत्न; AK 47 नं गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: शब्द जपून वापरा, नवीन कार्य सुरू करायला आजचा दिवस प्रतिकूल!
17
दोन दिवसांत केजरीवाल सोडणार मुख्यमंत्रिपद; नवी खेळी : म्हणाले, जनतेने प्रमाणपत्र दिल्यावरच पदावर परतणार
18
लवकरच जनगणना, जात रकान्यावर निर्णय नाही; पहिलीच डिजिटल गणना, स्व-गणनेचीही संधी
19
वैद्यकीय प्रवेशाच्या आमिषाने फसवणूक; दाेघांना अटक; मुंबईसह दिल्लीत गुन्हे
20
यांचे गुऱ्हाळ, त्यांची चक्की! ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता

सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करू

By admin | Published: May 02, 2017 3:22 AM

रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असून, सर्वांच्या साथीने रायगड जिल्हा राज्यात अग्रेसर होण्यासाठी

अलिबाग : रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असून, सर्वांच्या साथीने रायगड जिल्हा राज्यात अग्रेसर होण्यासाठी प्रयत्न करू, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश महेता यांनी महाराष्ट्र दिन वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना केले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या५७व्या वर्धापन दिनानिमित्त सोमवारी त्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.या समारंभासाठी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले, जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश नार्वेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे आदी उपस्थित होते. या वेळी शुभेच्छा देताना पालकमंत्र्यांनी रायगड जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या विविध कामगिरीचा उल्लेख करून जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले व जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन केले. रायगड किल्ला संवर्धन बाबतही पालकमंत्र्यांनी विशेष उल्लेख करून राज्य सरकार करीत असलेल्या कामांची माहिती दिली. पद्मश्री सन्मानाबद्दल स्वच्छतादूत डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व स्थानिक स्वराज्य संस्थेतील नूतन पदाधिकाऱ्यांचे त्यांनी अभिनंदन केले. पोलीस दलाचे पुरु ष व महिला प्लॅटून, होमगार्डचे पुरुष व महिला प्लॅटून, दामिनी पथक, बीट मार्शल पथक, नगरपालिका अग्निशमन दल, बॉम्बशोध व नाशक पथक, शीघ्र कृती दल, पोलीस बॅन्ड पथक यांनी मानवंदना दिली. उत्कृष्ट लघुउद्योजकांसाठी विजय पालकर, महाड यांना प्रथम तर सुवर्णा पुराणिक यांना द्वितीय पुरस्काराने सन्मानित केले. होमगार्ड क्र ीडा स्पर्धेत कबड्डी व कुस्ती क्रीडा प्रकारातील प्रथम-द्वितीय विजेत्या खेळाडूंचाही सन्मान करण्यात आला. यात कबड्डी योगेश पाटील, सुरेश म्हात्रे, प्रदीप पाटील, सिद्धार्थ पाटील, विवेक ठाकूर, यश अगिने, प्रज्योत सावंत, सोमनाथ पानसरे, तर कुस्ती-प्रतीक पाटील, जयेंद्र भोमकर यांचा समावेश आहे. (विशेष प्रतिनिधी)विशेष कामगिरीबद्दल सन्मानविशेष कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायती, यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलात उत्तम कामगिरी केलेले पोलीस निरीक्षक विक्र म जगताप, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर जानू खोत, सहायक फौजदार मदन खरे, पोलीस हवालदार पी. एस. खेडेकर, अशोक भुसाणे, हेमंत पाटील, प्रमोद मानकर, विश्वास गंभीर, मुन्ना रमजान पटेल, नवनाथ पाटील यांना पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह, तसेच नक्षलग्रस्त विभागात दोन वर्षे समाधानकारकपणे कठीण व खडतर कामगिरी केल्याबद्दल सहायक पोलीस निरीक्षक सागर कावळे व सुहास सुरेश आव्हाड यांना विशेष सेवा पदक देण्यात आले. वैभव आंब्रे सजा शिरवली (ता. माणगाव) येथील तलाठी यांना आदर्श तलाठी पुरस्कार देण्यात आला.स्मार्ट ग्राम पारितोषिकपर्यावरण संतुलित समृद्ध ग्रामयोजनेचे रूपांतर स्मार्ट ग्रामयोजनेत उत्कृष्ट काम केलेल्या १५ ग्रामपंचायतींचा पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. यात रोहा तालुका धाटाव ग्रामपंचायत, पनवेल तालुका सावळे ग्रामपंचायत, माणगाव तालुका चांदोरे ग्रामपंचायत, पेण तालुका सावरसई ग्रामपंचायत, अलिबाग तालुका आंबेपूर ग्रामपंचायत, उरण तालुका जासई ग्रामपंचायत, म्हसळा तालुका फळसप ग्रामपंचायत, महाड तालुका वरंडाली ग्रामपंचायत, खालापूर तालुका नारंगी ग्रामपंचायत, श्रीवर्धन तालुका दिवेआगर ग्रामपंचायत, पोलादपूर तालुका माटवण ग्रामपंचायत, तळा तालुका पडवण ग्रामपंचायत, मुरु ड तालुका मिठेखार ग्रामपंचायत, कर्जत तालुका हुमगाव ग्रामपंचायत, सुधागड तालुका जांभुळपाडा ग्रामपंचायत या ग्रामपंचायतींचा सन्मान केला.कर्जत नगरपालिका प्रांगणात ध्वजारोहणकर्जत : कर्जतमध्ये राज्य स्थापनेचा ५७वा वर्धापन दिन कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. कर्जत नगरपालिकेच्या प्रांगणातील ध्वजारोहण नगराध्यक्ष रजनी यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी मुख्याधिकारी दादाराव आटकोरे, उपनगराध्यक्ष अर्चना बैलमारे, विरोधी पक्षनेत्या यमुताई विचारे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, अशोक ओसवाल, माजी उपनगराध्यक्ष पुष्पा दगडे, सुवर्णा जोशी, अरु णा वायकर, बिनीता घुमरे, मुकेश पाटील उपस्थित होत्या. मात्र, निम्या नगरसेवकांनी महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाकडे पाठ फिरवली होती. तसेच माजी उपनगराध्यक्ष रामकृष्ण मोकल, नितीन परमार, बळवंत घुमरे, वसंत सुर्वे, नंदकुमार मणेर, मोरेश्वर शहासने, आदींसह कर्मचारी वर्ग उपस्थित होता. कर्जत तहसील कार्यालयातील ध्वजारोहण आमदार सुरेश लाड यांच्या हस्ते करण्यात आले. प्रांत अधिकारी दत्तात्रेय भडकवाड, तहसीलदार अविनाश कोष्टी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे, नायब तहसीलदार राजेंद्र घायाळ, किरण पाटील आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कोकण ज्ञानपीठ कर्जत महाविद्यालयातील ध्वजारोहण प्राचार्य डॉ. रवींद्र देशमुख यांच्या हस्ते, पंचायत समिती कार्यालयातील ध्वजारोहण सभापती अमर मिसाळ यांच्या हस्ते, उपविभागीय अधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण प्रांताधिकारी दत्तात्रेय भडकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील ध्वजारोहण उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल, पोलीस ठाण्यातील ध्वजारोहण पोलीस निरीक्षक सुजाता तानवडे, माथेरान नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, माथेरान अधीक्षक कार्यालयात अधीक्षक सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.महाराष्ट्र दिन उत्साहात साजराआगरदांडा : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ५७व्या वर्धापन दिनी विविध कार्यक्रमांनी सोमवारी तालुक्यात सर्व ग्रामपंचायत व शहरात सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. मुरुड तहसीलदार कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी ८ वाजता मुरुड तहसीलदार योगीता कोल्हे याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्याआधी मुरुड नगरपरिषद, माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा, मुरुड शहरातील आझाद चौकात येथे मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी नायब तहसीलदार दिलीप यादव, संदीप पानमंद, नगराध्यक्षा स्नेहा पाटील, मुख्याधिकारी दयानंद गोरे, गटविकास अधिकारी संजय चव्हाण, उपनगराध्यक्षा नौसिन दरोगे, नगरसेवक विश्वास चव्हाण आदी उपस्थित होते. म्हसळ्यात कर्मचाऱ्यांचा गौरवम्हसळा : आखिल भारतीय जैन संघटना रायगड विभाग, सर्वज्ञ आधार फाउंडेशन आणि पी.एन.पी.हायस्कूल पाष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जागतिक कामगार दिनी तालुक्यातील उत्कृष्ट सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी नायब तहसीलदार भिंगारे, आखिल भारतीय जैन संघटना रायगडचे अध्यक्ष बाबूलाल जैन, गटशिक्षणाधिकारी गजानन साळुंखे, नगराध्यक्ष दिलीप कांबळे, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड आदी उपस्थित होते.या वेळी महसूल विभागातील पुरवठा अधिकारी मंगेश पवार, पोलीस नाईक आर्यशील मोहिते, हरेश पवार (बांधकाम), बालकृष्ण गोरनाक (परिमंडल वनअधिकारी), अरविंद बैनवाड (शिक्षण), सुजय कुसाळकर (कृषी), हरी सतवे (वीज), संदीप दिवेकर (लेखनिक), अनंत कासारे (स्वच्छता), सरिता नाईक (ग्रंथपाल), कविता गढरी (आरोग्य), मनाली कुडेकर (अंगणवाडी), अनंत शिर्के (वाहक), बबन जंगम (पोस्ट), संदेश पाटील (बँक), संतोष जंगम (शिपाई हायस्कूल), शकील हुर्जुक (शिपाई अंजुमन), अनिल बुधकर (शिपाई) आदींचा गौरव करण्यात आला.रेवदंडा येथे महाराष्ट्र दिन साजरारेवदंडा : परिसरात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला. ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच सोनाली मोरे यांनी ध्वजारोहण केले, तर विविध शाळा, कार्यालये या ठिकाणी ध्वजारोहण कार्यक्रम झाले. पारनाका येथे नवचैतन्य मंडळातर्फे सालाबादप्रमाणे महापूजा आयोजित केली होती. सांस्कृतिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.नागोठण्यात हुतात्म्यांना आदरांजली नागोठणे : महाराष्ट्र राज्याचा ५७वा वर्धापन दिन अर्थात महाराष्ट्र दिन सोहळा शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरात सर्व सरकारी कार्यालये, बँका, शाळा आदी ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. मुख्य सोहळा ग्रामपंचायत कार्यालयासमोर घेण्यात आला. या वेळी सरपंच प्रणय डोके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्र माला उपसरपंच शैलेंद्र देशपांडे, सदस्य प्रकाश मोरे, ग्रामविकास अधिकारी योगेश गायकवाड आदी मान्यवरांसह ग्रामपंचायत कर्मचारी, तसेच नागरिक उपस्थित होते. या वेळी हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. ध्वजवंदन सोहळ्यानंतर ग्रामसभा घेण्यात आली. महाडमध्ये महाराष्ट्र दिन साजरा महाड : महाडमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. चांदे क्र ीडांगणावर आ.भरत गोगावले यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी प्रांताधिकारी सुषमा सातपुते यांच्यासह वरिष्ठ शासकीय अधिकारी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महाडकर नागरिक, तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते. नगरपरिषदेत नगराध्यक्षा स्नेहल जगताप, तर पंचायत समितीत सीताराम कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.पोशीर विद्यालयात ध्वजारोहणनेरळ : कर्जत तालुक्यात सर्वत्र १ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला. कर्जत तालुक्यातील पोशीर येथील श्रमजीवी जनता विद्यालयात प्राचार्य भाऊसाहेब सांगळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. पोशीर विद्यालयात सकाळी ७.३० वाजता महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्र म पार पडला. त्यानंतर २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.