कर्जत रेल्वे स्थानकातील काढलेले पत्रे बसविले

By admin | Published: January 30, 2017 02:08 AM2017-01-30T02:08:24+5:302017-01-30T02:08:24+5:30

येथील रेल्वे स्थानकात गेल्या वर्षी पावसाळ्याच्या पूर्वी फलाट क्रमांक एकवरील पत्रे काढून नवीन पत्रे बसविण्यात आले होते. परंतु काढलेले सर्वच पत्रे परत

The letters from the Karjat railway station were sealed | कर्जत रेल्वे स्थानकातील काढलेले पत्रे बसविले

कर्जत रेल्वे स्थानकातील काढलेले पत्रे बसविले

Next

कर्जत : येथील रेल्वे स्थानकात गेल्या वर्षी पावसाळ्याच्या पूर्वी फलाट क्रमांक एकवरील पत्रे काढून नवीन पत्रे बसविण्यात आले होते. परंतु काढलेले सर्वच पत्रे परत न बसविल्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांना पावसाचे फटके आणि उन्हाळ्यात उन्हाचे चटके खात उभे राहावे लागत असे. याबाबत रेल्वे प्रश्नाविषयी गेली कित्येक वर्षे सातत्याने आवाज उठवणारे, तसेच एखादा विषय हाती घेतल्यानंतर त्याचा सतत पाठपुरावा करण्यासाठी प्रसिध्द असलेले व सामाजिक कार्यकर्ते पंकज ओसवाल यांनी याबाबतीत कर्जत रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला होता. काम पूर्ण न केल्यास कर्जत रेल्वे स्थानकात धरणे किंवा रेल्वे रोकोसारखे प्रकार करावे लागतील, असे ओसवाल यांनी कर्जत रेल्वे प्रशासनास कळविले होते.
ओसवाल यांनी निवेदनाची प्रत कर्जत येथील जीआरपी व आरपीएफ यांना सुद्धा दिली असल्याने व पंकज ओसवाल यांच्या पत्राने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असल्याने कर्जत रेल्वे स्थानकातील जीआरपीने त्वरित पंकज ओसवाल यांच्याशी संपर्कसाधून ओसवाल यांना विनंती करून तातडीने कर्जत रेल्वे स्थानकाच्या जीआरपीच्या केबिनमध्ये २९ आॅगस्ट २०१६ ला बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीला कर्जत रेल्वे स्थानकातील स्टेशन मास्तर, जीआरपी,आरपीएफचे अधिकारी आणि रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते. त्या वेळी पत्रे बसविण्यासाठी मेगा ब्लॉक घ्यावा लागेल असे पंकज ओसवाल यांना सांगण्यात आले. या बैठकीत बरीच चर्चा झाल्यानंतर पंकज ओसवाल यांनी तुम्हाला जे काही म्हणायचे आहे ते तुम्ही मला लेखी कळवा असाच आग्रह धरला होता व तसे न केल्यास आपण आपल्या परीने निर्णय घेऊ व त्याची पूर्णपणे जबाबदारी रेल्वे प्रशासनाचीच राहील असे लेखी स्वरूपात पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनास दिले होते.
एक महिना उलटून सुद्धा रेल्वे प्रशासनाने याबाबतीत काहीच हालचाल करीत नसल्याने पुन्हा पंकज ओसवाल यांनी सर्वांना स्मरण पत्र पाठविले असताना सुद्धा या बाबतीत रेल्वे प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने ओसवाल यांनी शेवटी याबाबतीत झालेल्या सर्वच प्रकाराची माहिती कागदपत्रांसह दिल्ली येथे रेल्वे मंत्रालयाकडे सादर केली. नंतर मुंबई येथील डीआरएमच्या कार्यालयातून पंकज ओसवाल यांना पत्र पाठविले असून तुमच्या मागणीची त्वरित दखल घेऊ व तुम्ही रेल्वे रोको वगैरे असे करू नका अशी विनंती या पत्रात केली आहे. पंकज ओसवाल यांना मुंबईच्या कार्यालयातून पत्र मिळाल्यानंतर काही दिवसांच्या कालावधीतच फलाट क्रमांक एकवर पत्रे बसविण्यात आले आहेत. (वार्ताहर)

Web Title: The letters from the Karjat railway station were sealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.