- मयूर तांबडेपनवेल : महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना ही रायगड जिल्ह्यातील नागरिकांना अतिशय उपयुक्त योजना ठरत आहे. गेल्या ६ वर्षांत या योजनेतून रायगड जिल्ह्यातील तब्बल ५५ हजार ४६५ रु ग्णांनी या योजनेतून उपचार घेतले असून त्यासाठी सरकारी तिजोरीतून १३९ कोटींचे अर्थसाहाय्य देण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील ८ रुग्णालयांमध्ये या योजनेअंतर्गत उपचार केले जात आहेत.जनतेला अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळाव्या, गरजू रुग्णांना कमीत कमी खर्चामध्ये वैद्यकीय सेवा देण्याच्या या उद्देशाने जुलै २०१२ मध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरू करण्यात आली. योजनेंतर्गत ९७१ शस्त्रक्रिया उपचार आणि १२१ पाठपुरावा सेवा म्हणजे फॉलोअप उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात. आरोग्य योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्यासाठी राज्यात केंद्राची प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि राज्य शासनाची महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना या दोन्ही योजना समन्वय साधून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलून महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना असे नामकरण करण्यात आले आहे.जनआरोग्य योजनेतून मिळणारे उपचार शेकडो रुग्णांना संजीवनी देत आहेत. दारिद्र्यरेषेखाली आणि दारिद्र्य रेषेवरील (पिवळे आणि केशरी शिधापत्रिका) रेशनकार्ड असलेल्या लोकांना योजनेचा लाभ मिळतो. ज्या रु ग्णांना योजनेतून उपचार हवे असतील त्यांनी रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, आधारकार्ड घेऊन सरकारने नियुक्त केलेल्या रु ग्णालयांशी संपर्क साधण्याचे आवाहन योजनेचे रायगड जिल्हा समन्वयक डॉ. रवींद्र प्रकाश जगतकर यांनी केले आहे.योजनेतून ९७१ आजारांवर मोफत उपचार केले जात असून कर्करोग, किडनी, कान, नाक, घसा, पोटाचे आजार, हाडांचे आजार, लहान मुलांचे आजार यासह छोट्या-मोठ्या आजारांवर उपचार व गरज पडल्यास शस्त्रक्रि या केली जाते. उपचारांसाठी दीड लाखांपर्यंत अर्थसाहाय्य दिले जाते, तर किडनी प्रत्यारोपणासाठी अडीच लाखांपर्यंतच्या खर्चाला मंजुरी मिळते.१ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ दरम्यान ५ हजार २३९ लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला. तर ९ हजार ७९० जणांवर शस्त्रक्रि या व वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. १ एप्रिल २०१८ ते ३१ जानेवारी २०१९ दरम्यान ४ हजार ३११ लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला असून ९ हजार ६३४ जणांवर शस्त्रक्रि या व वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. २०१७ या वर्षात २५ कोटी ७८ लाख ५३ हजार रु पये तर २०१८-१९ या वर्षात २२ कोटी ९३ लाख ७९ हजार ६३१ रु पये योजनेतून नागरिकांवर उपचारासाठी खर्च करण्यात आले आहेत. २ जुलै २०१२ ते जानेवारी २०१९ पर्यंत ५५ हजार ४६५ नागरिकांवर शस्त्रक्रि या व वैद्यकीय उपचार करण्यात आले असून त्यासाठी १३८ कोटी ८९ लाख ६९ हजार ६५० रु पये खर्च करण्यात आलेले आहेत. महात्मा फुले योजनेअंतर्गत वर्षाला दीड लाख रु पयांचा प्रति कुटुंबाला खर्च केला जातो. तर मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी अडीच लाख रु पयांची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.रायगड जिल्ह्यातील रु ग्णालयेसिव्हिल हॉस्पिटल, अलिबागउपजिल्हा रुग्णालय, माणगावटाटा मेमोरियल हॉस्पिटल, खारघरलाइफलाइन हॉस्पिटल, पनवेलएमजीएम रु ग्णालय, कामोठाएमजीएम रु ग्णालय, कळंबोलीउन्नती हॉस्पिटल, पनवेलडॉ. बिरमोळे हॉस्पिटल, पनवेलपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच कोणतीही गरज भासल्यास त्यांनी १५५३८८ क्रमांकावर संपर्क साधावा.- सुधाकर शिंदे,मुख्य कार्यकारी अधिकारी,राज्य आरोग्य सोसायटीमहात्मा फुले योजनेअंतर्गत वर्षाला प्रति कुटुंब दीड लाख तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये वर्षाला प्रति कुटुंब ५ लाख रु पयांचे उपचार केले जातात. प्रधानमंत्र्ी जनआरोग्य योजनेत १ लाख २० हजार ४८९ कुटुंबे ग्रामीण भागातील तर २० हजार ६२० शहरी भागातील आहेत.
महात्मा फुले आरोग्य योजना ठरतेय रुग्णांसाठी जीवनदायी, सहा वर्षांत ५५ हजार ४६५ रुग्णांवर उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2019 4:08 AM