सीवूडमध्ये विसर्जन मिरवणुकीत 7 भाविकांना लागला विजेचा धक्का; तिघांची प्रकृती चिंताजनक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 01:08 AM2019-09-13T01:08:15+5:302019-09-13T01:12:07+5:30
या घटनेत 7 भाविक जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे
नवी मुंबई - सीवूडचा महाराजा गणपतीची विसर्जन मिरवणूक सुरू असताना दुर्दैवी घटना घडली आहे. सीवूड उड्डाणपुलावर हायटेंशन वायर पडल्याने विजेचा धक्का बसून मिरवणुकीमधील काही भाविक जखमी झाल्याची घटना आहे. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पुलावरील वाहतूक केली बंद आहे.
या घटनेत 7 भाविक जखमी झाले असून तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. तर जखमींवर अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आशिष पारकर, शाम झावरे, प्रसाद पिसे, हरिश्चंद्र फाळके, योगेश निकम हे जखमी असून त्यांना उपचारासाठी अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे
सीवूड सेक्टर 48 मध्ये सीवूडचा महाराजा गणेशोत्सव साजरा केला जातो. या परिसरातील गणेशमूर्ती विसर्जनासाठी करावे तलावात नेल्या जातात.पण सीवूडचा महाराजाची मूर्ती उंच असल्याने विसर्जनाला दारावे तलावात जावे लागते. मिरवणूक सीवूड उड्डाणपूलावरून खाली आली असताना चौकात उच्च विद्युत दाबाच्या वाहिनीला मुर्तीचा वरील भाग लागला. वायर तुटल्याने भाविकांना विजेचा धक्का बसला.