शेकापच्या पारंपरिक गडांवर कमळ फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 01:53 AM2018-05-29T01:53:56+5:302018-05-29T01:53:56+5:30
पनवेल तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ५ जागेवर भाजपा मित्र पक्षाचे सरपंच निवडून आले आहेत. सोमवारी जाहीर झालेल्या निकालातून शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण
वैभव गायकर
पनवेल : पनवेल तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ५ जागेवर भाजपा मित्र पक्षाचे सरपंच निवडून आले आहेत. सोमवारी जाहीर झालेल्या निकालातून शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण भागात भाजपाचा जनाधार वाढल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून शेकापच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायती भाजपा व मित्र पक्षाने काबीज केल्या आहेत. पनवेल तालुक्यात मात्र शेकापने आपला गड राखला आहे.
माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, तालुकाध्यक्ष अरु ण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने या निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गुळसुंदे, कोन, चिखले, दुंदरे या ग्रामपंचायतींवर आतापर्यंत शेकापची सत्ता होती. गुळसुंदे ग्रामपंचायतीत भाजपाचे हरिश्चंद्र लक्ष्मण बांडे सरपंच, कोन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नीलेश नथुराम म्हात्रे, चिखले ग्रामपंचायत नामदेव माया पाटील, दुंदरे ग्रामपंचायतीवर अनसूया विष्णू कातकरी, मालडुंगे ग्रामपंचायतीवर हर्षदा सोमनाथ चौधरी सरपंच म्हणून भरघोस मतांनी विजयी झाल्या असून न्हावे ग्रामपंचायतीवर आघाडीचे जितेंद्र म्हात्रे, ओवळे ग्रामपंचायतीवर ग्रामविकास आघाडीच्या रेश्मा अमित मुंगाजी विजयी झाल्या. गुळसुंदे, चिखले, कोन, दुंदरे या ग्रामपंचायती शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जायच्या, परंतु आता या ग्रामपंचायतीवर भाजपाने आपला कब्जा सिध्द केला आहे. गुळसुंदे ग्रामपंचायतीत नूतन रमाकांत पाटील, मारु ती काशिनाथ माठळ, मनोज वसंत पवार, प्रभावती प्रभाकर कार्लेकर, पल्लवी नरेश ठाकूर, चिखले ग्रामपंचायतीत रमेश गणा गडकरी, रवींद्र बबन गडकरी, विनायक रमेश पाटील, सुरेखा योगेश पाटील, विजयी झाले आहेत.