शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
5
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
6
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
7
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
8
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
9
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
10
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
11
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
12
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
13
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
14
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
15
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
16
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
17
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
18
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
19
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
20
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 

शेकापच्या पारंपरिक गडांवर कमळ फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 1:53 AM

पनवेल तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ५ जागेवर भाजपा मित्र पक्षाचे सरपंच निवडून आले आहेत. सोमवारी जाहीर झालेल्या निकालातून शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण

वैभव गायकर  पनवेल : पनवेल तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ५ जागेवर भाजपा मित्र पक्षाचे सरपंच निवडून आले आहेत. सोमवारी जाहीर झालेल्या निकालातून शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्रामीण भागात भाजपाचा जनाधार वाढल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे अनेक वर्षांपासून शेकापच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायती भाजपा व मित्र पक्षाने काबीज केल्या आहेत. पनवेल तालुक्यात मात्र शेकापने आपला गड राखला आहे.माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, तालुकाध्यक्ष अरु ण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाने या निवडणुकीत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गुळसुंदे, कोन, चिखले, दुंदरे या ग्रामपंचायतींवर आतापर्यंत शेकापची सत्ता होती. गुळसुंदे ग्रामपंचायतीत भाजपाचे हरिश्चंद्र लक्ष्मण बांडे सरपंच, कोन ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नीलेश नथुराम म्हात्रे, चिखले ग्रामपंचायत नामदेव माया पाटील, दुंदरे ग्रामपंचायतीवर अनसूया विष्णू कातकरी, मालडुंगे ग्रामपंचायतीवर हर्षदा सोमनाथ चौधरी सरपंच म्हणून भरघोस मतांनी विजयी झाल्या असून न्हावे ग्रामपंचायतीवर आघाडीचे जितेंद्र म्हात्रे, ओवळे ग्रामपंचायतीवर ग्रामविकास आघाडीच्या रेश्मा अमित मुंगाजी विजयी झाल्या. गुळसुंदे, चिखले, कोन, दुंदरे या ग्रामपंचायती शेकापचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जायच्या, परंतु आता या ग्रामपंचायतीवर भाजपाने आपला कब्जा सिध्द केला आहे. गुळसुंदे ग्रामपंचायतीत नूतन रमाकांत पाटील, मारु ती काशिनाथ माठळ, मनोज वसंत पवार, प्रभावती प्रभाकर कार्लेकर, पल्लवी नरेश ठाकूर, चिखले ग्रामपंचायतीत रमेश गणा गडकरी, रवींद्र बबन गडकरी, विनायक रमेश पाटील, सुरेखा योगेश पाटील, विजयी झाले आहेत.