गायछापचा वारसदार भासवून लावला चुना, फेसबुकची मैत्री महागात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2022 08:51 AM2022-04-01T08:51:54+5:302022-04-01T08:52:24+5:30

फेसबुकवरील मैत्री पडली महागात

Lime pretended to be the heir of the cow print, Facebook friendship is expensive | गायछापचा वारसदार भासवून लावला चुना, फेसबुकची मैत्री महागात

गायछापचा वारसदार भासवून लावला चुना, फेसबुकची मैत्री महागात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : गायछाप कंपनीच्या मालकाचा मुलगा असल्याचे भासवून महिलेला व्यवसायाच्या बहाण्याने ९३ लाखांचा चुना लावल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. फेसबुकवरून मैत्री वाढवून ही फसवणूक करण्यात आली आहे.

सानपाडा येथे राहणाऱ्या जमुना वडगाये यांच्यासोबत हा प्रकार घडला असून, त्या बदलापूर नगरपरिषदेचे लेखा विभागातील सहायक संचालक प्रवीण वडगाये यांच्या पत्नी आहेत. २०१९ मध्ये त्यांची फेसबुकवर एका तरुणासोबत ओळख झाली होती. त्याने स्वतःचे नाव द्रिश मालपाणी असून, तो गायछाप कंपनीच्या मालकाचा मुलगा असल्याचे त्याने सांगितले होते. त्यांच्यातली ओळख अधिक वाढल्यावर त्याने संपत्तीवरून वडिलांसोबत आपला वाद झाला असून, तो वेगळा राहत असल्याचे सांगितले. मात्र, आपण पुण्यात क्लब सुरू करणार असून त्यात पैसे गुंतवल्यास दोन वर्षांत दुप्पट रक्कम परत देण्याचे आश्वासन दिले. त्याच्यावर विश्वास ठेवून जमुना यांनी रोख व दागिन्यांची मोड करून ९३ लाख १६ हजार रुपये द्रिश या तरुणाला दिले. दरम्यान, व्यवहाराचा करार करण्याचे ठरले असतानाही तो रक्कम घेऊनही वेळोवेळी चालढकल करत होता. त्यानंतरही वडिलांसोबत संपत्तीवरून खटला सुरू असल्याचे सांगून, लवकरच पैसे परत करतो असे सांगून अधिक रकमेची मागणी करू लागला. त्यानंतर मात्र जमुना यांनी त्याच्याकडे पाठपुरावा केला असता, त्याने फेसबुक व मोबाइलवर ब्लॉक करून संपर्क तोडला.

आर्थिक परिस्थितीची घेतली माहिती
nसंगमनेर येथे जाऊन प्रत्यक्षात उद्योगपती मालपाणी यांच्याविषयी चौकशी केली असता, द्रिश नावाचा त्यांना कोणी मुलगा नसल्याचे समोर आले. 
nशिवाय अनोळखी व्यक्तीने त्यांना मालपाणी यांचा मुलगा असल्याचे भासवून फसवणूक केल्याचेही उघड झाले. 
nयानुसार त्यांनी सानपाडा पोलिसांकडे तक्रार केली असता, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
nदरम्यान वडगाये यांच्या आर्थिक परिस्थितीची माहिती काढून संबंधिताने त्यांना हा गंडा घातल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

Web Title: Lime pretended to be the heir of the cow print, Facebook friendship is expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.