शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

परवाना विभागामुळे कोटींचे नुकसान

By admin | Published: November 23, 2015 1:12 AM

बाजार समितीमधील ३७०० व्यापाऱ्यांनी अद्याप साठा परवाना घेतलेलाच नाही. सलून, स्वीट मार्टसह हजारो व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करीत आहेत

नामदेव मोरे,  नवी मुंबईबाजार समितीमधील ३७०० व्यापाऱ्यांनी अद्याप साठा परवाना घेतलेलाच नाही. सलून, स्वीट मार्टसह हजारो व्यावसायिक विनापरवाना व्यवसाय करीत आहेत. परवाना विभागाच्या निष्काळजीपणाचा फटका पालिकेला बसत असून, कोट्यवधींचे नुकसान सहन करावे लागत आहे. शासनाने एलबीटी रद्द केल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका आर्थिक संकटात सापडली आहे. महत्त्वाचा आर्थिक स्रोत बंद पडल्यामुळे त्याचा परिणाम विकासकामांवर होवू लागला आहे. पैशांची निकड भासू लागल्यामुळे मनपा प्रशासनाने कोणत्या मार्गाने महसूल वाढेल याविषयी चाचपणी सुरू केली आहे. शहरात होर्डिंग लावण्यापासून, आकाशचिन्ह, हॉटेल व इतर व्यावसायिकांनी महापालिकेचा परवाना घेणे बंधनकारक असते. परवाना विभागाकडून वर्षाला २०० कोटींपेक्षा जास्त महसूल प्राप्त होवू शकतो. परंतु प्रशासनाने कधीही गांभीर्याने या विभागाकडे पाहिले नाही. २०१३ - १४ ला ७५ लाख रूपये परवाना शुल्क प्राप्त झाले होते. परंतु २०१४ - १५ ला उत्पन्न वाढण्याऐवजी ६४ लाख रूपये झाले आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच मार्केटमध्ये ३७०० व्यापारी आहेत. या व्यापाऱ्यांनी साठा परवाना घेणे बंधनकारक आहे. परंतु बाजार समिती सुरू झाल्यापासून अद्याप एकाही व्यापाऱ्याने हा परवाना घेतला नाही. यामुळे वर्षाला पालिकेचे जवळपास ३ कोटी रूपयांचे नुकसान होत आहे. व्यापाऱ्यांवर एवढी मेहरबानी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेची स्थापना झाल्यानंतर शहरातील कोणत्या व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक आहे याची यादी तयार केली आहे. कोणाला किती शुल्क आकारावे याविषयीही स्पष्ट तरतूद आहे. जवळपास ७० व्यवसायांसाठी पालिकेचा परवाना घेणे आवश्यक आहे. परंतु या नियमांची योग्य अंमलबजावणीच होत नाही. शहरात हॉटेल, फॅब्रिकेशन व इतर काही व्यावसायिक पालिकेचा परवाना घेतात. परंतु सलून, अनेक स्वीट मार्ट, ब्युटी पार्लर, मटण विक्रेते, आईस्क्रीम, फटाका दुकाने विनापरवाना सुरू आहेत. यामुळे पालिकेचे प्रचंड नुकसान होत आहे. शहरात होर्डिंग, भित्तीपत्रक लावण्यासाठीही पालिकेची परवानगी आवश्यक असते. परंतु परवाना विभाग व विभाग अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विनापरवाना होर्डिंगबाजी सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही फुकट्या जाहिरातबाजांवर कारवाई होत नाही. महापालिका प्रशासन परवाना नसणारांना नोटीस पाठविते, परंतु प्रत्यक्षात त्यांच्यावर काहीच कारवाई होत नाही. परवाना विभागाचा कारभार अमरीष पटनिगिरे यांच्याकडे असताना त्यांनी एपीएमसीच्या व्यापाऱ्यांना साठा परवाना घेण्यासाठीच्या सूचना केल्या होत्या. परंतु त्यांच्या नंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी पाठपुरावाच केलेला नाही. महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, महापौर सुधाकर सोनावणे यांनी लक्ष देवून परवाना विभागाचा महसूल वाढविण्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होवू लागली आहे.