शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

परवानगी नाकारलेल्या अर्जांची यादी संकेतस्थळावर

By admin | Published: May 13, 2016 2:44 AM

नैना क्षेत्रात बांधकाम प्रकल्पांच्या मंजुरीसाठी मागील दोन वर्षांत प्राप्त झालेल्या एकूण अर्जाचा कागदपत्रांसह तपशील जाहीर करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.

कमलाकर कांबळे,  नवी मुंबई नैना क्षेत्रात बांधकाम प्रकल्पांच्या मंजुरीसाठी मागील दोन वर्षांत प्राप्त झालेल्या एकूण अर्जाचा कागदपत्रांसह तपशील जाहीर करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. हा तपशील सिडकोच्या संकेतस्थळावर तसेच वृत्तपत्रात जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या प्रकल्पाला परवानगी का नाकारली गेली हे जगजाहीर होणार आहे.स्वराज डेव्हल्पर्सचे राज कंधारी यांनी आपल्या राहत्या घरी डोक्यावर गोळी झाडून आत्महत्या केली. प्रस्तावित गृहप्रकल्प उभारण्याला विलंब होवू लागल्याने कंधारी हे आर्थिक अस्थिरतेमुळे चिंतेत होते. याच नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केली आहे. या प्रकाराला सिडकोची नकारात्मक भूमिका जबाबदार असल्याचा जावईशोध शहरातील काही विकासकांनी काढला आहे. नैना क्षेत्रात बांधकाम परवानगीसाठी गेल्या दोन वर्षात सिडकोला एकूण २५१ अर्ज प्राप्त झाले आहे. त्यातील फक्त २९ प्रकल्पांना परवानगी देण्यात आली आहे. उर्वरित प्रकल्पांमध्ये त्रुटी दाखवून परवानगी नाकारण्यात आली आहेत. विशेष म्हणजे अनेकांनी वित्तसंस्थांकडून कर्ज घेवून येथे जमिनी खरेदी केल्या आहेत. परंतु बांधकाम परवानगी मिळत नसल्याने कोट्यवधींची गुंतवणूक अडकून पडली आहे. या परिस्थितीला सिडकोचा चालढकलपणा जबाबदार असल्याचा आरोप विकासकांकडून करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर विकासकांनी प्रकल्पाच्या परवानगीसाठी प्राप्त झालेले अर्ज आणि त्यासोबत जोडलेली कागदपत्रे जनतेला पाहता यावीत, यादृष्टीने ती संकेतस्थळावर अपलोड करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. तसेच वृत्तपत्रातूनसुध्दा ही माहिती जाहीर करण्याची योजना सिडकोने आखली आहे. यात परवानगी नाकारल्याची कारणे, नव्याने मागविलेल्या कागदपत्रांचा तपशीलसुध्दा अर्जनिहाय जाहीर केला जाणार असल्याची माहिती सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी दिली. दरम्यान, नैनाचा विकास आराखडा तयार करण्यास सिडकोकडून कोणताही विलंब झालेला नाही. एमएमआरएच्या १९९६ च्या डीसीआरनुसारच नैनाची नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यात कोणतेही नवीन नियम टाकले गेलेले नाहीत. विकास आराखडा तयार करण्याचे काम जोखमीचे होते. नागरिकांच्या सूचना व हरकतींचा विचार करून अंतिम आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. ही वस्तुस्थिती असतानाही विकास आराखडा तयार करण्यास विलंब झाला, असे म्हणणे अयोग्य असल्याचे व्ही. राधा यांनी स्पष्ट केले आहे.