कोकणातील तीन हजार उद्योजकांना कर्ज मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 12:26 IST2025-04-02T12:26:00+5:302025-04-02T12:26:18+5:30
Navi Mumbai: मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत कोकणातील चार जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयांनी १०० टक्के उद्दिष्ट साध्य करून तीन हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर केले आहे. कोकण विभागातील सुमारे १६ हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

कोकणातील तीन हजार उद्योजकांना कर्ज मंजूर
नवी मुंबई - मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेंतर्गत कोकणातील चार जिल्हा उद्योग केंद्र कार्यालयांनी १०० टक्के उद्दिष्ट साध्य करून तीन हजारांहून अधिक उद्योजकांना कर्ज मंजूर केले आहे. कोकण विभागातील सुमारे १६ हजार युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
या योजनेंतर्गत चालू वर्षात कोकण विभागासाठी ४,६०० प्रकरणांचे उद्दिष्ट दिले होते. यात जिल्हा उद्योग केंद्रांना २,७६०, तर खादी व ग्रामोद्योग विभागाला १,८४० प्रकरणांचा समावेश होता. कोकण विभागाने एकूण ३,२७३ कर्ज प्रकरणे मंजूर केली आहेत. यामध्ये ६१ कोटी अनुदान रकमेचा समावेश आहे. कोकणातील पाचही जिल्ह्यांच्या जिल्हा उद्योग केंद्र यंत्रणेला दिलेले उद्दिष्ट सलग दुसऱ्यांदा पूर्ण केले.
रोजगारनिर्मितीला मोठी चालना
मंजूर प्रकरणांमध्ये १ हजार ८ घटक हे उत्पादन क्षेत्रातील असून, २,२६५ घटक हे सेवा क्षेत्रातील आहे. यामध्ये ५० टक्के महिला व मागासवर्गीय उद्योग घटकांचा
समावेश आहे.
वरील कर्ज प्रकरणांमधून सुमारे १६ हजारांहून अधिक रोजगारनिर्मिती होणार आहे. विभागातील रोजगारनिर्मितीला मोठी चालना मिळेल, असा विश्वास कोकण विभागाचे उद्योग सहसंचालक विजू सिरसाठ यांनी व्यक्त केला आहे.
विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली कोकण विभागाने ही कामगिरी केली.