शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचे आदित्य ठाकरेंच्या वरळीत तगडे आव्हान; उद्धव ठाकरे अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार? 
2
१०५ काँग्रेस, ९५ उद्धवसेना, ८४ शरद पवार गट... अखेर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला!
3
आजचे राशीभविष्य : मित्रांकडून आणि विशेषतः स्त्रीवर्गाकडून लाभ होईल, व्यापारात फायदा होईल
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?
5
संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना
6
गुरुपुष्यामृत योग: १० राशींना शुभ-लाभ, धनलक्ष्मीची अपार कृपा; अचानक धनलाभ, दिवाळीला भरभराट!
7
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी
8
‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग
9
ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज
10
शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार
11
मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात
12
शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!
13
शेकापची मोठी खेळी, सहा उमेदवार जाहीर; महाविकास आघाडीत असतानाही जाहीर केली नावे
14
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
15
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
16
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
18
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
19
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
20
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!

सिडकोच्या घरांसाठी ३० लाखांपर्यंत कर्ज, विनाकागदपत्रे मिळणार मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 12:12 PM

CIDCO: सिडकोच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात आहेत. परंतु, उत्पन्नाची मर्यादा आणि कागदपत्रांच्या अभावामुळे अर्जदारांना गृहकर्ज देण्यास कोणतीही बँक तयार होत नाही,  ही बाब लक्षात घेऊन सिडकोने पावले उचलली आहेत.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई :  सिडकोच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोठ्या प्रमाणात घरे बांधली जात आहेत. परंतु, उत्पन्नाची मर्यादा आणि कागदपत्रांच्या अभावामुळे अर्जदारांना गृहकर्ज देण्यास कोणतीही बँक तयार होत नाही,  ही बाब लक्षात घेऊन सिडकोने पावले उचलली आहेत. त्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील  अर्जदारांना कागदपत्रांविना ३० लाख रुपयांचे गृहकर्ज देण्यास काही राष्ट्रीयीकृत बँकांनी तयारी दर्शविली आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर सिडकोने उलवे नोडमधील खारकोपर आणि बामणडोंगरी रेल्वे स्थानकाच्या परिसरात बांधण्यात येत असलेल्या  ७,८४९ घरांची योजना जाहीर केली आहे. यातील घरांचे क्षेत्रफळ ३१० चौरस मीटर इतके असून, त्यांची किंमत ३२ ते ३५ लाखांच्या दरम्यान आहे. यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल (ईडब्लूएस), अल्प उत्पन्न घटक आणि खुल्या वर्गासाठी घरे उपलब्ध आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २,७४७ घरे असून, त्यांची उत्पन्न मर्यादा वार्षिक तीन लाख रुपये इतकी आहे. एलआयजी प्रवर्गातील अर्जदारांना कोणतीही बँक किंवा वित्तसंस्थेतून सहज गृहकर्ज मिळू शकतो. मात्र, वार्षिक तीन लाख रुपये उत्पन्न मर्यादा असलेल्या ईडब्लूएस अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील घटकांना कर्ज मिळणे अवघड असते. ईडब्लूएस प्रवर्गातील अर्जदारांना सक्षम कागदपत्रांअभावी अगदी कमी व्याज दरात ३० लाखांचे गृहकर्ज देण्याची तयारी आयएलएफसी या  संस्थेने दर्शविली आहे. एसबीआय या राष्ट्रीयीकृत बँकेने २५ लाखांचे गृहकर्ज देण्यास सहमती दर्शविली आहे. तर पीएनबी आणि टीजेएसबी या दोन बँकांबरोबर वाटाघाटी सुरू आहे.

१० ते १२ लाखांनी  घरे हाेणार स्वस्त या घरांच्या किमती ३२ ते ३५ लाखांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे  खासगी विकासकांपेक्षा ही घरे महाग असल्याची चर्चा रियल इस्टेट मार्केटमध्ये सुरू आहे. प्रत्यक्षात मात्र प्रशस्त कॉम्प्लेक्स, दर्जेदार सुविधा, उच्च दर्जाचे बांधकाम, उत्तम कनेक्टिव्हिटी आदींमुळे ही घरे तुलनात्मकदृष्ट्या १० ते १२ लाखांनी स्वस्त असल्याचे सिडकोचे म्हणणे आहे.

टॅग्स :Homeसुंदर गृहनियोजनBanking Sectorबँकिंग क्षेत्रcidcoसिडको