लोकलची कारला धडक

By admin | Published: August 10, 2015 02:25 AM2015-08-10T02:25:21+5:302015-08-10T02:25:21+5:30

रूळ ओलांडणाऱ्या कारला जुईनगर येथे शनिवारी रात्री ट्रेनची धडक बसली. कार ट्रेनसोबत काही अंतरापर्यंत घासत गेली. लोकल कारशेडकडे जात

Local car hit | लोकलची कारला धडक

लोकलची कारला धडक

Next

नवी मुंबई : रूळ ओलांडणाऱ्या कारला जुईनगर येथे शनिवारी रात्री ट्रेनची धडक बसली. कार ट्रेनसोबत काही अंतरापर्यंत घासत गेली. लोकल कारशेडकडे जात असल्याने तिचा वेग कमी होता, त्यामुळे कारमधील महिला थोडक्यात बचावली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील रहिवाशांचा जमाव गोळा होऊन तणाव निर्माण झाला होता.
नेरूळकडून आलेली एक लोकल रात्री ९.३० च्या सुमारास कारशेडला जात होती. नेहमीप्रमाणे फाटक उघडे असल्याने वाहनांचीही ये- जा सुरूच होती. वाहनांना थांबण्याचा इशारा देण्यासाठी नेमलेला रेल्वे कर्मचारीही दूर बसला होता. रूळ ओलांडणाऱ्या एका कारच्या मागच्या बाजूला रेल्वेइंजीनचा बंपर धडकला. भविष्यातील अपघात टाळण्यासाठी रेल्वे क्रॉसिंगच्या ठिकाणी फाटक उभारण्याची मागणी संतप्त रहिवाशांनी केली आहे. जमावाने ही लोकल देखील सुमारे अर्धा तास अडवून धरली होती. अखेर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर थांबवलेली लोकल कारशेडमध्ये पाठवण्यात आली.
जुईनगर रेल्वे स्थानकालगत पश्चिमेला असलेल्या कारशेडचा मार्ग जीवघेणा ठरत आहे. फाटक नसल्याने रूळ ओलांडण्याच्या प्रयत्नात वाहनांना रेल्वेची धडक लागून अपघात होतात. फाटक उभारण्याची गरज असतानाही रेल्वे प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. जुईनगर सेक्टर ११ व २३ ला जोडणाऱ्या मार्गावरच हा रेल्वे रूळ आहे. कारशेडला जोडलेल्या या रुळामुळे ही दोन सेक्टर्स विभागली गेली आहेत. परंतु सानपाडा, जुईनगर व नेरूळ परिसराला जोडणारा हा सोयीचा मार्ग असल्यामुळे त्यावर सतत वर्दळ असते. पूर्वीचे रेल्वे फाटक जुने होऊन पडल्यानंतरही नवे फाटक बसवण्यात आलेले नाही. (प्रतिनिधी)

Web Title: Local car hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.