'लोकल'मध्ये महिला असुरक्षित, गुटखा खाऊन तरुणीच्या अंगावर थुंकला गर्दुल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 05:07 PM2019-08-26T17:07:58+5:302019-08-26T17:10:24+5:30
याबाबत संताप तिने याबाबत फेसबुक पेजवर व्हिडीओ पोस्ट करत व्यक्त केला आहे.
मुंबई - मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिकच बिकट बनत चालला आहे. नेरूळ येथे राहणारी रुणाली पाटील ही तरूणी शुक्रवारी वाशीहून पनवेलची लोकल पकडत असताना एक गर्दुला गुटखा खाऊन तिच्या अंगावर त्याने गुटख्याच्या पिचकाऱ्या मारल्या. ही घटना रात्री १०.३० मिनिटांनी घडली असून यावेळी तिने त्या गर्दुल्याला पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या गर्दुल्याला या तरूणीने प्रवाश्यांच्या मदतीने पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो तावडीतून पळाला आहे. याबाबत संताप तिने याबाबत फेसबुक पेजवर व्हिडीओ पोस्ट करत व्यक्त केला आहे.
रुणाली ही तरुणी वाशीहून पनवेलकडे जाण्यास निघाली होती. गर्दुल्ला वाशीच्या दुसऱ्या प्लॅटफॉर्मवरील लोकलमध्ये चढला गर्दुल्ल्याने तरुणीच्या पाठीमागून येत तिच्या अंगावर गुटखा खाऊन थुंकला. यावेळी लोकल सानपाडा रेल्वे स्टेशनला आली होती. दरम्यान तरुणीने आरडाओरडा करून त्या गर्दुल्ल्याला पकडा अशी विनंती इतर प्रवाशांना केली. काही लोकांनी त्याला पकडून चांगलाच मार दिला आहे. मात्र, हा गर्दुल्ल्याने प्रवाशांच्या कचाट्यातून पळ काढला.