Lockdown: मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीही बंद ठेवा; माथाडी संघटनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 02:29 AM2020-07-03T02:29:47+5:302020-07-03T02:30:07+5:30
सुरक्षेसाठी लॉकडाऊन आवश्यक असल्याची भूमिका
नवी मुंबई : महानगरपालिकेने ४ ते १३ जुलैदरम्यान संपूर्ण नवी मुंबईत लॉकडाऊन जाहीर केला आहे. परंतु यामधून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला वगळले आहे. कामगारांच्या सुरक्षेसाठी बाजार समितीही १० दिवस बंद ठेवावी, अशी मागणी माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे.
नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेने ४ जुलैपासून नवी मुंबईमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे. १० दिवस अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, असे सांगताना दुसरीकडे सर्वाधिक गर्दी होणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाजार समितीमध्ये आतापर्यंत अनेक माथाडी कामगार, सुरक्षारक्षक, व्यापारी यांना कोरोनाची लागण झाली आहे. काहींचा मृत्यू झाला आहे. बाजार समितीमधील सर्व घटकांच्या सुरक्षेसाठी बाजार समितीमधील सर्व व्यवहार १० दिवस बंद ठेवावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. याविषयी शासनाकडे पत्रव्यवहारही केला आहे.
१० दिवस अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार बंद ठेवले जाणार आहेत. नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. नागरिकांनी कुठेही गर्दी करू नये, असे सांगताना दुसरीकडे सर्वाधिक गर्दी होणारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.