Lockdown News: नगरसेवकांचा कार्यकाळ आज संपणार; नवी मुंबईत प्रशासकीय राजवट लागू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 01:47 AM2020-05-07T01:47:59+5:302020-05-07T01:48:09+5:30

नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांचा कालावधी ७ मे २०२० पर्यंत आहे.

Lockdown News: Corporator's term ends today; Administrative rule will be implemented in Navi Mumbai | Lockdown News: नगरसेवकांचा कार्यकाळ आज संपणार; नवी मुंबईत प्रशासकीय राजवट लागू होणार

Lockdown News: नगरसेवकांचा कार्यकाळ आज संपणार; नवी मुंबईत प्रशासकीय राजवट लागू होणार

Next

नवी मुंबई : महानगरपालिकेतील १११ नगरसेवकांचा कार्यकाळ ७ मे रोजी संपत आहे. महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू होणार असून सर्व अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहेत. महापौरांसह सर्व पदाधिकाऱ्यांची वाहनेही जमा करण्यात आली आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून आलेल्या नगरसेवकांचा कालावधी ७ मे २०२० पर्यंत आहे. या कालावधीपूर्वी सहावी पंचवार्षिक निवडणूक होणे आवश्यक होते. निवडणूक विभागाने यासाठी कार्यवाही ही सुरू केली होती, परंतु कोरोनामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यमान नगरसेवकांचा गुरूवारी शेवटचा दिवस असणार आहे. ८ मेपासून महानगरपालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ प्रशासक म्हणून काम पाहतील. सर्व अधिकार त्यांना असणार आहेत. कार्यकाळ संपल्यामुळे महापौर व इतर पदाधिकाऱ्यांची वाहनेही जमा करून घेण्यात आली आहेत. पुढील निवडणूक होईपर्यंत महानगरपालिकेतील सर्व प्रस्ताव व निविदांना मंजुरी देण्याचे व धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार ही आयुक्तांना असणार आहेत.

Web Title: Lockdown News: Corporator's term ends today; Administrative rule will be implemented in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.