Lockdown: नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; आठ लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 02:04 AM2020-07-03T02:04:39+5:302020-07-03T02:04:55+5:30

आरोग्य संरक्षणासाठी काळजी घेण्याचे आवाहन

Lockdown: Punitive action against violators; Recovery of eight lakhs | Lockdown: नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; आठ लाखांची वसुली

Lockdown: नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई; आठ लाखांची वसुली

googlenewsNext

नवी मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी लागू केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. परंतु अनेकांकडून या नियमांचे पालन होताना दिसत नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. याअंतर्गत कारवाई करून आतापर्यंत सुमारे ७ लाख ९२ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांनी नियमांचे पालन करून आरोग्य संरक्षणासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन महापलिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

नवी मुंबई शहरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने आपल्या आठही विभाग कार्यालय क्षेत्रांत प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. याअंतर्गत रस्त्यावर थुंकणे, मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणे आदी कोरोनाच्या प्रसारासाठी पूरक ठरणारे कृत्य करणाºया बेजबाबदार नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार सार्वजनिक स्थळी चेहºयावर मास्क, रूमाल न वापरणे याकरिता ५00 रुपये, रस्ते, बाजार, रुग्णालय, कार्यालय अशा सार्वजनिक स्थळी थुंकणे यासाठी १000 रुपये, सर्व दुकानदार, फळे, भाजीपाला विक्रेते, सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेते आदी व्यापारी तसेच त्या ठिकाणी खरेदीसाठी जाणाºया ग्राहकांकडून शारीरिक अंतराचे बंधन न पाळणे यासाठी २00 रुपये दंड ठोठावला जात आहे. दुसºयांदा हाच गुन्हा केल्यास दंडाची रक्कम दुप्पट व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येत आहे.

लॉकडाऊनमध्ये सहकार्य करण्याचे आवाहन
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी ३ जुलैच्या रात्रीपासून १३ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत १0 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या कालावधीमध्ये नागरिकांनी आपल्या घरातच थांबावे व कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. लॉकडाऊनची बंधने ही आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्य हितासाठी आहेत. याची नोंद घेऊन संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे. सामाजिक अंतर न राखल्यास दुकानदार, ग्राहक अशा दोघांवर कारवाई करण्यात येणार आहे.

Web Title: Lockdown: Punitive action against violators; Recovery of eight lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.