शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

राज्याच्या किनारपट्टीवर लवकरच लुटा फ्लोटेल्स, हाउसबोट्स, सीप्लेनचा आनंद

By नारायण जाधव | Published: October 16, 2023 5:11 PM

मेरी टाइम बोर्डाने घेतला पुढाकार : बंदर विकासाबरोबरच स्थानिकांची उन्नती करणार

नवी मुंबई : राज्याच्या ७२० किमीच्या समुद्र किनारपट्टीवर लवकरच बंदर विकासासह विविध उद्योगांची उभारणी दिसणार असून त्यांच्या विकासासाठी जलवाहतूक, रो-रो सेवा आणि फ्लोटेल्स, हाउसबोट्स, सीप्लेन, पाण्यावर धावणाऱ्या बसचा आनंद लुटता येणार आहे. याशिवाय पर्यटकांना समुद्र भ्रमणासह मनोरंजनासाठी मासेमारी करता येणार आहे. महाराष्ट्र मेरी टाइम बोर्डाने यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील किनारपट्टीवर उपरोक्त क्षेत्रात सेवा देण्यासाठी जे इच्छुक आहेत, अशा उद्योजकांकडून मेरी टाइम बोर्डाने ११ जानेवारी २०२४ पर्यंत स्वारस्य देकार मागविले आहेत.

महाराष्ट्राची ७२० किलोमीटरची किनारपट्टी ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा समुद्रकिनारपट्टी आहे. यामुळे राज्यात सागरी विकासाची प्रचंड क्षमता आहे. आजघडीला राज्यात दोन प्रमुख बंदरांसह ४८ छोटी बंदरे आहेत. यामुळे येथील सागरी संसाधनांचा लाभ उठवून राज्याच्या आर्थिक वृद्धीसाठी राज्य शासनाने हे उद्योग सुरू करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. यातून नोकऱ्या निर्माण करण्याबरोबरच किनारपट्टीचा विस्तार हा केवळ पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक करण्यासाठीच न करता त्या भागातील नागरिकांची सामाजिक-आर्थिक प्रगती साधणे हा हे उद्योग सुरू करण्यामागचा उद्देश आहे.

हे उद्योग सुरू करणार

संपूर्ण किनारपट्टीलवर सूक्ष्म/लहान/मध्यम/मोठे/मेगा सुरू करणे. यात प्रामुख्याने कॅप्टिव्ह जेट्टी, शिपयार्ड, जहाज दुरुस्ती, जहाजांचा पुनर्वापर, मरिना विकसित करणे, रो-रो/रो-पॅक्स फेरी सेवा सुरू करणे, कोस्टल शिपिंगला चालना देणे, बंदराच्या विकासासाठी आवश्यक अशा औद्योगिकीकरण वाढविण्यासह जलवाहतूक, फ्लोटेल्स, हाउसबोट्स, सीप्लेन, पाण्यावर धावणाऱ्या बस सुरू करण्यात येणार आहेत. याशिवाय पर्यटकांना समुद्र भ्रमणासह मनोरंजनासाठी मासेमारी करण्याचा आनंद घेता येईल, असे पर्यटनपूरक उद्योग, व्यवसायांना चालना देण्यात येणार आहे.

नवी मुंबईतही होणार फ्लोटेल

सागरी पर्यटनाला चालना देण्यासाठी नवी मुंबईत हे ‘फ्लोटेल’ उभारले जाणार आहे. गेल्या वर्षीच यासाठी निविदा मागविल्या होत्या. कारण या परिसरात लवकरच आंतरराष्ट्रीय विमानतळ आकार घेत आहे. सी लिंकच्या उभारणीमुळे दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई शहर एकदम जवळ येणार आहे. याच परिसरात जगप्रसिद्ध घारापुरी लेणींसह बेलापूर किल्ला, जेएनपीटी, गेटवे ऑफ इंडिया, रेवस मार्गे अलिबाग जोडले जाणार आहे. यामुळे ‘फ्लोटेल’ उभारण्यासाठी नवी मुंबईतील बेलापूर-उलवे खाडीची निवड केली आहे.

बेलापूर जेट्टीवरून पर्यटकांची ने-आण

नवी मुंबईतील नियोजित ‘फ्लोटेल’वर पर्यटकांची ने-आण करण्यासाठी बेलापूर जेट्टीवरून केली जाणार आहे. या जेट्टीचा वापर लवकरच मुंबई-नवी मुंबईसह ठाणे-कल्याण-मीरा-भाईंदर-वसईपर्यंतच्या जलवाहतुकीसाठीही होणार आहे. यामुळे महामुंबईतील सर्वच शहरांतील पर्यटकांना नवी मुंबईतील या ‘फ्लोटेल’चा लाभ घेणे सोपे होणार आहे.

टॅग्स :Sea Routeसागरी महामार्गNavi Mumbaiनवी मुंबई