पनवेल : परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने खारघरमधील एक ठगाने एका व्यक्तीस ३ लाख रु पयांचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. यासंदर्भात खारघर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. खारघर सेक्टर ३५ येथे राहणारा नागेंद्र वर्मा याची शैलेंद्र पांचाळ याच्याशी ओळख झाली होती. त्यानंतर स्वत:ची परदेशी कंपनीत ओळख असल्याचे सांगत, वर्मा याने शैलेंद्र याला आपल्या जाळ्यात ओढले. परदेशात नोकरी लावण्यासाठी वर्माने ३ लाखांची मागणी केली. मात्र, ३ लाख रु पये देऊनही शैलेंद्रला नोकरी लागत नव्हती. आपल्याला नोकरी लागत नसल्याचे लक्षात आल्यानंतर शैलेंद्रने नागेंद्रकडे पैशाचा तगादा लावला. मात्र, नागेंद्र पैसे देत नसल्याने यासंदर्भात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्यावर नागेंद्रविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने लुबाडले
By admin | Published: January 10, 2017 7:03 AM