वैभव गायकर
पनवेल: जयसिंगपूर येथून अभय पाटील हे काही कामानिमित्त कामोठे येथे आले होते. त्यांचे काम करुन ते मॅकडॉनल्ड येथून खासगी चार चाकी वाहनाने पुणे येथे गेले, पण पुणे येथे उतरत असताना त्यांचा मोबाईल त्याच वाहणात विसरल्याने त्यांना आढळून आले. त्यावेळी त्यांनी गाडीचा शोध घेतला परंतु गाडी मिळून आली नाही. याबाबत अभय पाटील यांचे नातेवाईक अमित रणदिवे यांना संपर्क करून त्यांनी झालेला प्रकार त्यांना सांगितले.
रणदिवे यांनी कळंबोली वाहतूक शाखेचे अतुल शिंदे यांना याबाबत माहिती दिली.त्यानुसार पोलीस हवालदार शिंदे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हारुभाऊ बनकर यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ मॅकडोनाल्ड बीटचे अंमलदार सोमनाथ गायकवाड यांना संपर्क करून माहिती दिली.
दोन्ही अंमलदार यांनी तात्काळ मॅकडोनाल्ड येथे जाऊन पेट्रोल पंपाचे सीसीटीव्हीव्दारे गाडी नंबर प्राप्त करून त्यावरून संपर्क क्रमांक मिळून त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी काही वेळाने फोन उचलला व सदरचा फोन हा सायलेंटवर असून प्रवासी गाडीतच विसरले असल्याची माहिती वाहन चालकाने दिली.यावेळी अवघ्या दोन तासातच अभय पाटील यांना त्यांचा फोन मिळाला.78 हजार किमंतीचा हा फोन आयफोन कंपनीचा होता.रामदिवे यांनी वाहतूक पोलिसांच्या तत्परतेचे स्वागत करीत त्यांना धन्यवाद दिले.