प्रेमीयुगलांचा धुडगूस

By admin | Published: December 25, 2016 04:41 AM2016-12-25T04:41:49+5:302016-12-25T04:41:49+5:30

शहरातील उद्याने व इतर काही सार्वजनिक ठिकाणांवर प्रेमीयुगलांनी धुडगूस घातला आहे. त्यांच्या अश्लील चाळ्यांमुळे सामान्य नागरिकांची कुचंबणा होत आहे.

Lovelier | प्रेमीयुगलांचा धुडगूस

प्रेमीयुगलांचा धुडगूस

Next

- कमलाकर कांबळे,  नवी मुंबई
शहरातील उद्याने व इतर काही सार्वजनिक ठिकाणांवर प्रेमीयुगलांनी धुडगूस घातला आहे. त्यांच्या अश्लील चाळ्यांमुळे सामान्य नागरिकांची कुचंबणा होत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या अनिर्बंध व स्वैर वर्तणुकीला कोणाचाही लगाम नसल्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला चालना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उद्यानांसह विरंगुळ्याच्या सार्वजनिक ठिकाणी इतरांना लज्जास्पद वाटेल, असे कृत्य करणाऱ्या प्रेमीयुगलांवर कारवाईची मागणी नागरिकांडून होत आहे.
नागरिकांच्या विरंगुळ्याच्या ठिकाणांवर प्रेमीयुगलांनी ताबा मिळवला आहे. अनेक उद्याने दुरुस्तीअभावी ओस पडली असून, त्यापैकी काही ठिकाणी रात्रीच्या वेळी दिवे बंद असतात. याचा पुरेपूर फायदा सर्वच वयोगटातील प्रेमीयुगलांकडून घेतला जात आहे. त्यामुळे विरंगुळ्यासाठी बनवलेली उद्याने अश्लील चाळे करण्याची ठिकाणे बनली आहेत.
शहरात विरंगुळ्याच्या ठरावीकच जागाआहेत. यात प्रामुख्याने वाशी विभागातील मिनी चौपाटी, सागर विहार, तसेच पामबीच मार्गावरील नेरूळ तलाव, सीबीडीतील सरोवर विहार आदींचा समावेश आहे. त्याशिवाय ठिकठिकाणी महापालिकेने विकसित केलेल्या उद्यानांच्या जागा आहेत. या बहुतांशी ठिकाणी प्रेमीयुगलांचा मुक्त वावर दिसून येतो. मिनी चौपाटी आणि सागर विहार परिसरात, तर सकाळी १० वाजल्यापासून प्रेमीयुगलांचा वावर सुरू होतो. या परिसरातील घनदाट झाडीचा आडोसा घेऊन ही जोडपी एकमेकांना बिलगून तासनतास येथे बसून असल्याचे दिसून येते.
पामबीच मार्गावरील नेरूळ तलाव आणि सीबीडीच्या सरोवर विहार परिसरातही हेच चित्र पाहवयास मिळते. अखंड प्रेमात बुडालेल्या या प्रेमीयुगलांचे चोरून चाळे पाहणाऱ्या अंबटशौकिनांचाही येथे नियमित
वावर असतो. ही परिस्थिती गुन्हेगारी
घटनेला अप्रत्यक्षरीत्या
प्रोत्साहन देणारी असल्याने अशा प्रेमीयुगलांना रोख लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सैराट तरुणाईला आवर घाला
उद्यान व सार्वजनिक ठिकाणी अश्लील व लज्जास्पद चाळे करणाऱ्यांत महाविद्यालयीन तरुणाईबरोबरच शाळेतील अल्पवयीन मुलांचे व मुलींचे प्रमाण लक्षणीय असल्याचे दिसून येते. अनेकदा शाळेच्या युनिफार्मवर पाठीला दप्तर लटकावून ही मुले उद्यानाच्या एखाद्या कोपऱ्यात तासनतास बसून असतात. सिनेमा, टीव्ही, फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप आदी प्रसारमाध्यमांमुळे सैराट झालेल्या या तरुणाईला आवर घालण्याची प्राथमिक जबाबदारी त्यांच्या पालकांची असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
खारघरमधील ड्रायव्हिंग रेंजला पसंती
खारघर येथील गोल्फ कोर्सजवळ असलेल्या ड्रायव्हिंग रेंज या स्थळाला प्रेमीयुगलांची अधिक पसंती आहे. या परिसरात सकाळपासूनच जोडप्यांची रेलचेल पाहावयास मिळते.
त्याचप्रमाणे या परिसरातील खारघर हीलवरही तरुणाईचा वावर दिसून येतो. खारघरच्या स्कायवॉकवर टप्प्याटप्प्यांवर जोडप्यांचा तळ दिसून येतो.

जोडप्यांचा वावर असणारी प्रमुख ठिकाणे
वाशीतील मिनी चौपाटी व सागर विहारचा परिसर
खारघर सेंट्रल पार्क
पामबीच मार्गावरील नेरूळ तलाव
सीबीडीतील मॅन्गो गार्डन, पारसिक हील टेकडी
ऐरोली येथील गवळी देव धबधबा
शहरातील दुर्लक्षित उद्याने, पडिक इमारती व रेल्वे स्थानकांचा परिसर

Web Title: Lovelier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.